सप्तरंग

न - कर्त्या नायकाचा अवकाश 

अमोल पालेकर

बासुदा, आजच्या दिवसासाठी मी तयार होतोच एका प्रकारे... कारण गेली पाच-सहा वर्षे तुमचं स्मितहास्य कधी ढळलं नाही, तरीसुध्दा तुमची प्रकृती कशी खालावत होती हे मी बघत होतो. असं असून सुध्दा, "तुम्ही नाही' हे मी  कायमच नाकारत राहीन! 1968 च्या आपल्या अगदी पहिल्या सामोवार मधल्या भेटीचे दृश्‍य या क्षणी सुध्दा स्वच्छ समोर आहे. मराठीतल्या 'मुंबईचा जावई'चं हिंदी रुपांतर "पिया का घर' नावाया सिनेमानी तुम्ही करणार होतात. तोपर्यंत तुमचा "सारा आकाश' आणि फिल्म सोसायटीच्या चळवळीमधला ऐरणीचा माणूस म्हणून तुम्ही माहित होतात. मला आवडलं  असतं तुमच्याबरोबर काम करायला नक्कीच, पण "प्रोड्युसरला जाऊन भेट' ही तुमची अट मला मान्य नव्हती. मी  नाकारली ती फिल्म ! तरीसुध्दा "रजनीगंधा'साठी तुम्ही मला पुन्हा विंचारलंत याचं मला पुन्हा पुन्हा राहून राहून  आश्‍चर्य वाटायचं. पण कडवटपणा हा तुमच्या वृत्तीतच कधी नव्हता. एक काळ, तयार झालल्या सिनेमाचे डबे  घेऊन वितरकांचे उंबरठे झिजवावे लागले होते तुम्हाला. वारंवार हाती आलेल्या अपयशामुळे का कोण जाणे, पण  तुमची तरल विनोद बुध्दी जास्त जास्त उत्कट होत गेली.  मी मागचा पुढचा विचार न करता "रजनीगंधा'साठी "हो' म्हणालो. तेव्हापासनू आपली प्रेमकथा सुरु झाली. कधी गोष्ट काय आहे, हे विचारलं नाही की कधी तुमच्याशी मानधनाबदल चर्चा केली नाही. तुमच्या न्याय्य व्यवसायिक दृष्टिकोनावर अंध विश्‍वास ठेवला. कदाचित या सगळ्यामुळे तुम्ही इतकं भरभरुन प्रेम माझ्यावर  केलंत. सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या अवकाशांवर बेतलेल्या तुमच्या सिनेमांचा मी एक अविभाज्य हिस्सा बनलो. मला तुम्ही नायक केलंत. मला आणि माझ्यासोबतच्या हिरोइनना ही नवीन ओळख दिलीत. नायकाचं न-कर्तेपण  लोकांच्या गळी उतरवलंत. कोणताच अभिनिवेश नसलेल्या तुमच्या न-कर्त्या नायकांचा हळुवारपणा, त्यांचं अडखळणं, त्याकाळी रुढ असलेल्या माचो नायकांच्या तुलनेत लोकांना खूप आवडून गेलं. 

तुम्हाला गल्लाभरू सिनेमा करायचा नव्हता हे तुमच्या मनात स्वच्छ होतं. तुम्हाला वेगळ्या धाटणीच्या कथा साध्या सोप्या पध्दतीने मांडायच्या होत्या. तेव्हाच्या प्रचलित सिनेमांचे ठोकताळे वापरणं तुम्ही टाळले. दोन ओळींपलिकडे कथानक नसणं, कथेमध्ये खलनायक नसणं, नाट्यात्मक कलाटणी नसणं, प्रस्थापित मोठे नट-नट्या न वापरणं, हे सगळं प्रथेला सोडून होतं. तरी सुध्दा तुमची स्वतःची अशी एक खास मांडणी/शैली होती. तुमच्या नायक/नायिकांना नाव आणि आडनाव असायचे,धर्म असायचा. हे हिंदी  सिनेमांमध्ये त्या काळी प्रचलित असणाऱ्या प्रथेच्या विरुध्द होतं, व्यक्तिरेखांचं  पाटीकरण करणं तुम्हाला मान्य नव्हतं. त्याच प्रमाणे गंभीर अंगाची मांडणी न करता, हलकाफुलका सिनेमा लोकांच्या जास्त पचनी पडतो ही नसही तुम्ही फार पूर्वी ओळखली होती. तसंच मुख्य धारेच्या सिनेमांमध्ये असलेलं संगीताचं महत्व तुम्ही जाणून होतात. त्यामुळे सिनेमामधली अवीट गाणी हा तुमच्या सिनेमाचा अंगीभूत भाग होता. संगीताचं कोणतंही शास्त्रशुध्द शिक्षण नसतानाही तुमचा कान इतका तयार होता ज्यामुळे तुमच्या सिनेमातली अजरामर गाणी हे तुमचं मोठं योगदान आहे. मी तुमचा नायक म्हणून काम केलेल्या सहाही सिनेमांतली अप्रतिम गाणी याचे श्रेय लोक कारण नसताना मला देतात. येसुदाससारख्या अप्रतिम गायकाचा आवाज मला दिलात. यात माझं कतृत्व खरं तर काहीच नाही. एकाही सिनेमात "आय लव यू' असं न म्हणता, हिरॉईनच्या तीन फूट लांब राहून सुध्दा अतोनात प्रेम व्यक्‍त करण्याची संधी तुम्हीच मला दिलीत. दिग्दर्शक कुठेही न दिसता कथानक प्रभावीपणे उलगडवण्याची तुमची हातोटी, मी नकळत किती आत्मसात केली होती याचा प्रयय, मी स्वतः जेव्हा दिग्दर्शक म्हणून कॅमेरामागे उभा राहिलो तेव्हा जाणवला. सिनेमाचे चित्रीकरण सुरु करण्याआधी संपूर्ण पटकथा आणि संवाद तयार असले पाहिजेत या शिस्तबध शिस्तीचे संस्कार ही तुमच्याकडूनच झाले. किती आणि काय काय दिलंत मला... कशाकशासाठी ऋणी राहू मी तुमचा याची पाचशे शब्दात न मावणाऱ्या यादीची सुरुवात इथे केली आहे. एवढंच ! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT