Unnecessary-Hair
Unnecessary-Hair 
सप्तरंग

अनावश्यक केसांवरील उपचार

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
अनावश्यक केसांवरील उपचाराचे दोन भाग आहेत. सुदैवाने ९० टक्के व्यक्तींमध्ये रक्तात कोणताही दोष आढळत नाही. अशा रुग्णांमध्ये फक्त सौंदर्योपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घेतले, तरीसुद्धा पुरेसे ठरते. यात तात्पुरते व कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत. यापैकी कायमस्वरूपी उपचार त्वचारोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावेत. यात अतिशय गुणकारी असे लेसर उपचार उपलब्ध आहेत. तज्ज्ञ व्यक्तींकडून उपचार घेतल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा लेसर उपचार केले जातात. साधारणत: सहा ते आठ वेळा हे उपचार केल्यानंतर काळे व राठ केस जवळ जवळ ९० टक्के कमी होतात. आजकाल तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे हे उपचार सहज उपलब्ध झाले आहेत. याचा खर्चही अनेक रुग्णांच्या आवाक्यात आहे.

शरीराच्या कोणत्याही भागातील केस एका वेळेस काढता येतात. उपचारासाठी लागणारा कालावधी काही मिनिटांचाच असतो. त्यासाठी कोणतीही भूल द्यावी लागत नाही. बाह्यरुग्ण विभागात हे उपचार होतात. पुरुषांमध्ये गालावरील राठ केस, कानांच्या पाळींवर येणारे केस, हातपाय तसेच काखेतील केसही आपण लेसरद्वारे घालवू शकतो. त्याचप्रमाणे, मानेवर किंवा दाढी केल्यानंतर वारंवार फोड उमटत असल्यासही लेसरचा उपचार प्रभावी आहे. नाकावर काळ्या ठिपक्यांप्रमाणे दिसणारी केसांची टोकेही लेझरद्वारे घालवता येतात.

पाठीच्या खालील भागात माकड हाडाजवळ असलेले पाइलोनायडल सायनससाठीही हे उपचार करता येतात. अतिशय पातळ, सोनेरी रंगाचे व पांढरे केस लेसर उपचारातून जात नाहीत. त्यासाठी इलेक्ट्रोलायसिस उपचार करता येतात. कायमस्वरूपी उपचार नको असतील अशा व्यक्ती थ्रेडिंग, वॅक्सिंग, ब्लिचिंग हे तात्पुरते उपचार निवडू शकतात. संप्रेरकांचे असंतुलन असणाऱ्या व्यक्तींनी पोटातून गोळ्या घेणे गरजेचे आहे. काही वेळा स्त्रीरोगतज्ज्ञ व अंत:स्रावतज्ज्ञ यांच्या एकत्रित सल्ल्याने उपचार सुरू ठेवावे लागतात. औषधांबरोबरच व्यायाम करणे, आहारातील तेलकट, गोड व मैद्याचे पदार्थ कमी करणे गरजेचे आहे. व्यायाम फक्त जाड व्यक्तींनीच करावा, असा कल आढळतो. पण सडपातळ व्यक्तींमध्येही संप्रेरकांचे असंतुलन असू शकते. त्यामुळे या व्यक्तींनीही व्यायाम करणे तितकेच गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT