हसण्यासाठी जगा sakal
सप्तरंग

हसण्यासाठी जगा

लहानपणापासून प्रत्येकाची अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे दिवाळीची सुट्टी!

मकरंद टिल्लू

लहानपणापासून प्रत्येकाची अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे दिवाळीची सुट्टी!  या सुट्टीमध्ये मन ताजंतवानं करण्याची ताकद आहे.  समाजाला एक वेगळा उत्साह दीपावली देऊन जाते. ‘दिवाळीमध्ये आपल्याला आनंदी का वाटतं?’ याचा आपण विचार करायला लागलो, तर अनेक गोष्टी सापडतील.

दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत स्वच्छता होते.  रांगोळ्या काढल्या जातात.  आकाशकंदील  लावले जातात.  पणत्या  पेटवल्या जातात.  आतषबाजी होत असते.  सर्व ठिकाणची अस्वच्छता निघून जाते आणि प्रकाशाचं आगमन होतं, तिथे तिथे  मनाच्या वृत्ती उल्हसित होतात.

चकली, शेव, कडबोळी, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, लाडू अशा अनेक चवदार पदार्थांची रेलचेल असते. गोड पदार्थांबरोबरच खमंग पदार्थही जिभेला आनंद देतात. शरीराच्या आनंदाचं कुलूप उघडणारी पहिली किल्ली म्हणजे जीभ! दररोजच्या आयुष्यात तेच तेच पदार्थ आलटून पालटून खाल्ले जातात. त्यात बदल झाला की चवदार आनंद होतो.

नेहमी ‘चिडचिड’ करणारी मंडळी, ‘सणावाराच्या दिवसात रागवायचं नाही’ असं स्वतःला वारंवार सांगून शांत राहतात. लोक भेटल्यावर एकमेकांना आनंदाच्या शुभेच्छा देतात. आनंदाचे मेसेज पाठवतात. फोन करतात. नकारात्मकता विचारपूर्वक टाळली जाते. हे सकारात्मक विचार संपूर्ण समाजाला आनंदाची दिशा देतात. एका अर्थाने या काळात रागावर ताबा ठेवण्याचं प्रशिक्षण मिळत असतं.

ज्येष्ठांचा मान, नवीन लग्न झालेल्यांचा दिवाळ सण, नवरा बायकोचा पाडवा, भावा-बहिणीचं जपलेलं नातं यानिमित्ताने कुटुंब एकत्र येत असतात. सुट्टीच्या काळात मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन गेट-टुगेदर करतात. जेव्हा जेव्हा नाती जपली जातात तेव्हा तेव्हा मनाला आनंद होतो. अंधारात एकट्याने जाताना भीती वाटते. कोणीतरी सोबत असलं की मानसिक बळ येतं. ‘जगण्याच्या प्रवासात आपण एकटे नाही’ ही जाणीव जपलेली नाती करून देतात. यामुळे मनाचं सामर्थ्य वाढतं.

भेटवस्तूंवरील चिकटपट्ट्या काढून, कागद काढण्यात एक वेगळाच आनंद असतो. या काळात लोक आठवणीने एकमेकांना भेटवस्तू देतात. वस्तूच्या किमतीपेक्षाही आठवण ठेवून भेटवस्तू दिली, याचा जास्त आनंद असतो. एकमेकांबद्दल वाटणारा आदरभाव, प्रेम, कृतज्ञता व्यक्त केली जाते. भेटवस्तू देण्याच्या कृतीतून सकारात्मक आठवणींची अभिव्यक्ती केली जाते.

घराघरांमध्ये मुलांचा उत्साह प्रचंड असतो. ‘किल्ला’ करण्यापासून ते ‘कल्ला’ करण्यापर्यंत, लहान मुलांबरोबर विविध गोष्टी घरातली मोठी मंडळी करत असतात. मोठ्या मंडळींच्या मनात लपलेलं लहान मूल बाहेर आलं की आनंद द्विगुणित होतो.

शारीरिक आणि मानसिक पातळीवर सकारात्मकता निर्माण करण्याचं सामर्थ्य दिवाळीत आहे. अभ्यासाची पुस्तकं सुट्टीत बंद होतात पण आनंदाचं पुस्तक लोकं उघडतात. ‘दिवाळीमध्ये आनंदी मनोवृत्ती कशामुळे होते?’ या दृष्टीने अभ्यास केला, तर त्यातून सकारात्मक जगण्याची अनेक उत्तर सापडू शकतात. वर दिलेल्या उदाहरणा व्यतिरिक्त, आपणही विचार करून इतर पैलू जरूर शोधा.

प्रत्येकाला आनंदात जगणं हवं असतं. त्यासाठी आनंद कशामुळे निर्माण होतो ते शोधावं लागतं. आनंदाच्या निर्मितीची कारणं शोधण्यासाठी, ‘आपण त्यावेळी कोणती कृती केली?’ याचा शोध घ्यावा लागतो. या आनंदाच्या कृतीची विचारपूर्वक पुनरावृत्ती करता आली तर मन उल्हसित करण्याचा गाभा सापडतो. चला आनंदाच्या पुस्तकाचा आपण अभ्यास करूया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT