Psychosis 
सप्तरंग

भित्यापाठी ब्रह्मराक्षस...

डॉ. आदित्य पाटील

आरोग्यमंत्र - डॉ. आदित्य पाटील, मनोविकारतज्ज्ञ
‘‘डॉक्टर काहीपण करा, पण ही सततची भीती काढून टाका हो. छोटं काम करायचं म्हटलं ना तरी ते जमेल की नाही याची भीती, गाडी चालवताना अपघात होण्याची भीती, गर्दीमध्ये गुदमरून जाण्याची भीती. घरच्यांना काहीतरी होईल याची भीती.

गंभीर आजार होण्याची भीती. चार शब्द बोलायचं ठरवलं तर चूक होईल का, लोक काय म्हणतील याची भीती. कधीकधी कशाची भीती वाटते, तेच कळत नाही. डॉक्टर एकदा तर मला भीतीचीच भीती वाटू लागली हो.’’ समीर पोटतिडकीने सांगत होता. समीरला फक्त भीती नव्हती, त्याला होता चिंतेचा आजार (Anxiety Disorder). वर्तमानातील, खऱ्याखुऱ्या धोक्याचा सामना करताना जी भावना येते ती भीती असते; पण भविष्यात असं काहीतरी होईल, या कल्पनेतील धोक्यामुळं येते ती चिंता (Anxiety). चिंतेच्या विकारात विचार, भावना आणि वर्तन यामधील सुसूत्रता कमी होते. चिंता प्रत्येकवेळी चुकीची असते का? योग्य प्रमाणात असणारी चिंता भविष्याबद्दल सजग ठेवते, नियोजन करायला मदत करते, आपले सामर्थ्य आणि मर्यादा यानुसार निर्णय घेण्यात मदत करते आणि आपल्या प्रगतीमध्ये उपयुक्त ठरते.

मात्र, हीच चिंता सतत आपला पिच्छा करू लागल्यास मात्र तिचा त्रास होतो. उठता-बसता सतत नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, ढळलेली एकाग्रता, मनाची चलबिचल, चिडचिड होऊ लागते. या सगळ्यांचा शरीरावरही परिणाम होतो. सततच्या ताणामुळे मेंदू ‘सिंपथेटीक नर्व्हस सिस्टिम’ जागृत करतो. शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, मग विचारांसोबत छातीत धडधड, अंगाला घाम, हातापायांची थरथर, श्वासोच्छ्वासाचा त्रास, रक्तदाबामध्ये चढउतार, डोकेदुखी यासारखे शारीरिक त्रासदेखील सुरू होतात. कधीकधी चिंता फक्त एखाद्या परिस्थितीपुरती मर्यादित असते, कधी एखाद्या स्थानाशी. काही लोकांमध्ये तीव्र चिंतेचे झटके (Panic Attack) येतात. एकंदरीत चिंतेचा आजार जडलेल्या व्यक्तींच्या मागे हा भीतीचा ब्रह्मराक्षसच लागतो म्हणा ना. या राक्षसापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला जातो, तितका तो अजून मोठा होतो. यावर उपाय? चिंतेचा विकार झालेल्या व्यक्तीला भविष्यात एखाद्या धोक्याची शक्यता नाही, तर शाश्वतीच वाटत असते. त्यामुळे अशा व्यक्तीने शक्यतांची पडताळणी करणं आवश्यक असतं.

आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांच्या आधारे पाऊल उचलणं गरजेचं असतं. भावनांचे नियमन करणं शिकावं लागतं. शिथिलीकरणाचे व्यायाम, योगासने, ध्यान, विपश्यना, शारीरिक व्यायाम आणि योग्य आहार चिंतेचा विकार कमी  होण्यास मदत करतात. REBT, CBT यासारख्या मानसोपचारांनी चिंता पूर्णतः कमी होऊ शकते. गरज पडल्यास औषधांची मदत घेता येते. या ब्रह्मराक्षसाचा वध करण्यासाठी विचार, भावना आणि वर्तन या आयुधांचा वापर योग्य रितीने करण्यात आपण पारंगत होणं आवश्यक आहे.
(उद्याच्या अंकात - स्किझोफ्रेनिया - गरज आधाराची)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT