सप्तरंग

#MokaleVha : मैत्रिणीला मानसिक त्रास

ॲड. मनीषा गवळी

माझी २३ वर्षांची मैत्रीण आहे. तिचा स्वभाव चांगला असल्याने ती सगळ्यांशी मिळून मिसळून बोलते. तिला समाजकार्याची पण आवड आहे. पण तिला याचा बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. तिचा असा स्वभाव बघून खूप मुले तिला मागणी घालतात व सतत कॉल, मेसेज करतात. तिला काय करावे कळत नसल्याने ती शांत रहाते. तिला हे आवडत नाही. या तिला होणाऱ्या मानसिक त्रासाने ती खचून गेली आहे. तिने काय करावे?
स्त्रिया होणाऱ्या त्रासाबद्दल कोणाला सांगितले तर आपलीच बदनामी होईल, असे वाटून शांत रहातात. समोरच्याने गृहीत धरू नये म्हणून तुमच्या मैत्रिणीने ठामपणे मला हे आवडत नाही म्हणणे गरजेचे आहे. तुम्ही आपला होणारा त्रास दुसऱ्यांना सांगितला तर पुढे तुम्हाला साक्षीदार म्हणून ते मदत करतील. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण या कायद्याखाली तुमच्या कंपनीत १० पेक्षा जास्त लोक असतील तर तुमच्या कंपनी मालकाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तांत्रिकदृष्ट्या तशी समिती नसल्यास तुम्ही जिल्हास्तरीय स्थानिक समितीकडे याबाबत लेखी तक्रार द्या. तुम्हाला आलेले मेसेज व फोन कॉल्स पुरावा म्हणून द्या. सदर बाबतीत तुमच्या नावासहित संपूर्ण कार्यवाही गोपनीय राहील. तसेच तुमचे म्हणणे ऐकून तुम्हाला अनुकूल असा निर्णय समिती देईल.  
----------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ भावी पतीस सांगू का?
मी गावातील तरुणी आहे. आईवडिलांच्या गरिबीमुळे २ वर्षापूर्वी एका व्यक्तीने शहरात नोकरीचे आमिष दाखवून मला फसवून देहविक्रीसाठी विकले. परंतु माझ्या सतर्कतेमुळे अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांनी मला सोडवले. झाल्या घटनेतून मी पुरेशी सावरलेले नाही. घरचे माझे लग्न जमवत असून भावी नवऱ्याला ही घटना व पोलिस केसबद्दल सांगू की नको, या द्विधा मनस्थितीतून मला सोडवा.

भारतातील देहविक्रयासंदर्भातील कायदे कडक करूनही वाढते गुन्हे हा ज्वलंत विषय आहे. तुम्ही आत्मविश्वास आणि परिस्थितीवर मात करण्याच्या जोरावर धाडसाने स्वत:ची सुटका करून घेतली. लग्नापूर्वी भावी पतीस ही घटना सांगा. लग्नानंतर आयुष्यभर एकत्र राहताना नात्यातील पारदर्शकता आवश्यक असते. महिला अत्याचारातील केसमध्ये पीडीतेबाबत गोपनीयता असली तरी कोर्टात सुनावणीच्या वेळी साक्षीपुराव्याला तुम्हाला जावे लागेल. त्यावेळी बाहेरून ही गोष्ट पतीला समजल्यावर तुमच्या नात्यावर कायमस्वरूपी अविश्वास, संशय अथवा अन्य गंभीर परिणाम होईलच शिवाय तुमच्याही मनात अपराधी भावना राहील. समोरच्या व्यक्तीची संवेदनशीलता पडताळून सत्य जाणूनही होकार येईल असे वाटल्यावरच त्या व्यक्तीला सत्य सांगा. अन्यथा त्याने गोपनीयताही न पाळल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. विश्वासू जोडीदार मिळाल्यास त्याच्या साथीने काळाच्या ओघात व समुपदेशकाच्या मदतीने मानसिक धक्क्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून नवीन वाटा शोधणे, हा आयुष्य सुंदर करण्याचा गुरुमंत्र आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT