Smoking
Smoking 
सप्तरंग

धूम्रपान आणि हृदयविकार

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ
धूम्रपान हे हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतात. भारतामध्ये धूम्रपानाव्यतिरिक्त तंबाखू सेवनाचे विविध प्रकार आहेत. उदा. बिडी, गुटखा, मिश्री, खैनी, पानमसाला इत्यादी. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश, म्हणजे ३० टक्के लोकसंख्या तंबाखूचे कोणत्या तरी प्रकारात सेवन करते. तंबाखू अनेक लोकांना आपल्या जीवनाचा भाग वाटते. तंबाखू सेवनामध्ये काही गैर आहे, असेही त्यांना वाटत नाही. तथापि, तंबाखू सेवनाचे अत्यंत दूरगामी आणि गंभीर परिणाम आपल्या हृदय आणि इतर अवयवांवर होतात. 

हृदयविकार आणि तंबाखूसेवन काय संबंध आहे?
धूम्रपानामुळे आपल्या रक्तातील ट्रायग्लिसेरॅडिस हा हानिकारक चरबीचा घटक वाढण्यास मदत होते. एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते व पर्यायाने रक्त जास्त प्रमाणात घट्ट  होऊन त्याची गुठळी होण्याची शक्यता वाढते. तसेच एथरोस्क्लेरोसिस या रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर प्लाक चढण्याची प्रक्रिया तीव्र होते.

या सगळ्यांचा परिणाम होऊन हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याची शक्यता बळावते. धूम्रपानामधील निकोटीन नामक घटक हे हृदयाला हानिकारक परिणाम घडवते. निकोटिनमुळे आपल्या हृदयास होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. रक्तदाब वाढतो. आपल्या हृदयाचे ठोके अधिक गतीने पडू लागतात आणि पर्यायाने हृदयावर ताण येतो.
 
निष्क्रिय धूम्रपान आणि हृदयविकारामधील संबंध निष्क्रिय धूम्रपान म्हणजे आपल्यासमोरील व्यक्तीने धूम्रपान करणे व तो धूर आपण श्‍वासामधून शरीरात घेणे. निष्क्रिय धूम्रपानामध्ये आपण गाफील राहिल्यामुळे धूम्रपानाचे सर्व हानिकारक परिणाम धूम्रपान न करता देखील होतात.

निष्क्रिय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची साधारणपणे ३० टक्के अधिक शक्यता असते. निष्क्रिय धूम्रपान टाळण्यासाठी धूम्रपानाची परवानगी असलेल्या ठिकाणी जाऊ नये. आपले धूम्रपान करणारे मित्रमंडळी कुटुंबीयांना घरामध्ये अथवा आपल्यासमोर धूम्रपान करण्यास मज्जाव करा. हृदयविकाराची जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तंबाखूसेवन टाळणे. कधीही धूम्रपान करू नका. तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते सोडू शकता. धूम्रपान सोडल्याने आपल्याला हृदयविकार होण्यापासून आणि त्यापासूनच्या मृत्यूचा धोका कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT