Liver 
सप्तरंग

यकृत कर्करोगावरील उपचारपद्धती

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
यकृत कर्करोगाचे प्राथमिक स्थितीत निदान झाले तरच आजार बरा करण्यासाठी उपचार करता येतात. एकदा का आजार बळावला आणि कर्करोग वाढला की फारसे उपचार करता येत नाहीत आणि सहा महिन्यांमध्ये रुग्ण दगावू शकतो. 

१.     हा कर्करोग समूळ काढून टाकता येतो किंवा यकृतरोपण करता येते- क्‍युरेटिक उपचारपद्धती
२.    ब्रिजिंग : शस्त्रक्रिया किंवा यकृतरोपण होईपर्यंत रेडिओलॉजीने यकृत कर्करोगाची उपचारपद्धती होते. यामध्ये ट्यूमर जाळला जातो. अथवा जागच्या जागी (local) किमोथेरपी दिली जाते. टेस (TACE) किंवा जागच्या जागी रेडिऐशन थेरपी (TARE) दिली जाते. 
३.     डाऊन स्टेजिंग : कित्येक वेळेला निदान होतानाच या कर्करोगाची गाठ खूप मोठी असते. अर्थातच त्या वेळी लगेचच शस्त्रक्रिया करता येत नाही. त्या वेळी ही कर्करोगाची गाठ छोटी करण्यासाठी वरील रेडिओलॉजीच्या माध्यमांचा वापर करण्यात येतो. एकदा गाठ छोटी झाली की, पुन्हा एकदा शस्त्रक्रिया किंवा यकृतरोपणाबद्दल विचार करता येतो. 
४.     पॅलेटिव्ह इन्टेन्ट (Palliative Intent) : कित्येक वेळेस निदान होतेवेळी ही गाठ खूप मोठी असते किंवा रक्तवाहिन्यांमध्ये पसरलेली असते. ती शरीरात इतरत्रही पसरलेली असते. अशावेळी कुठलेच उपचार करता येत नाहीत. रुग्णाला शक्य तेवढ्या कमी त्रासात ठेवावे लागते. अशावेळी वेदनाशामक दिली जातात आणि रुग्णाला कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेतली जाते. 

यकृताचा कर्करोग कसा टाळता येईल?
१)     मुळातच सिऱ्हॉसिस टाळता आला तर यकृताचा कर्करोग टाळता येईल. त्यामुळेच मद्यपान न करणे, स्थूलपणा येऊ न देणे, मधुमेहाची योग्य काळजी घेणे, या बाबी महत्त्वाच्या आहेत. 
२)     हिपॅटायटिस बीची लस टोचून घेणे आवश्यक आहे.
३)     तसेच हिपॅटायटिस बी, सी, मधुमेह किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे यकृताचा आजार झाला असेल तर नित्यनेमाने म्हणजेच दर सहा महिन्यांनी सोनोग्राफी व रक्ताची ट्यूमर मार्कर चाचणी करणे आवश्यक आहे. 
४)     डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणेही आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT