texting language
texting language 
सप्तरंग

जाणून घ्या टेक्‍स्टीजचे तोटे !

डॉ. सुनील व डॉ. अश्‍विनी गोडबोले

आरोग्य मंत्र
आजची तरुण पिढी, त्यातही किशोरवयीन मुले टेक्‍स्टीज भाषेचा खूपच वापर करत आहेत. त्यामुळे अनेक विचारवंत, भाषातज्ज्ञांनी मूळ भाषा काही वर्षांत मृतप्राय होतील, असा अंदाज व्यक्त केलाय! इतकेच नाही, तर थोडक्‍यात जास्तीत जास्त व्यक्त करण्याच्या प्रयत्नांत भाषेचे सौंदर्य गायब होणार, याचीच जास्त काळजी वाटत आहे. एका संशोधनात टेक्‍स्टीज वापरणाऱ्या मुलांना विरामचिन्हांचा वापरच नीट करा येत नसल्याचे जाणवलेय. तर दुसऱ्या एका संशोधनात मुले मोठी उत्तरे, निबंध नीट लिहून शकत नाहीत, हेही पुढे आलेय. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे ही टेक्‍स्टीज वापरणारी मुले प्रत्यक्षात संवाद साधतानासुद्धा थोडक्‍यात बोलून थांबतात.

शेजारीशेजारी बसून एकमेकांना मेसेजेस पाठवणारी मुले प्रत्यक्षात एकमेकांशी किती बोलू शकतील, हा प्रश्‍न पडू लागलाय. इमोजीची चित्रे वापरणाऱ्यांच्या भाषेची तुलना प्राचीन काळातल्या आदिमानवाच्या चित्रलिपीशी करण्याचा मोह येथे आवरता येत नाही! ‘एक चित्र बऱ्याच गोष्टी बोलते’ हे खरे असले, तरी प्रसंगाला अनुरूप शब्दांची साखळी करून वाक्‍य बनवणे, हे इमोजीच्या साठ्यातून योग्य ते चित्र काढून ते वापरण्यापेक्षा जास्त सहज आहे. सुंदर अलंकारिक भाषा, विशेषणांची रेलचेल, शब्दांशी केलेला धमाल खेळ, अभंगाची रसाळ भाषा, नेमक्‍या शब्दांतून भाव व्यक्त करण्याची कला, पुणेरी शालजोडीतले शब्द मारणे, शाब्दिक कोट्या, सुभाषिते ही सगळी भाषेची वैशिष्ट्ये या मेसेजेसच्या संवादात कुठे हरवतील, हे समजणार नाही! इथे आणखी एक लक्षात घेऊयात, की आपली मराठी, साहेबांची इंग्रजी हे सगळे वाद टेक्‍स्टीज भाषेच्या आक्रमणात संपून जाणार आहेत. त्यात हेही लक्षात येतेय, की पूर्वी भाषेत लक्षणीय बदल व्हायला एक दशक लागायचे. आता इंटरनेटच्या जमान्यात एखादे वर्ष पुरेसे ठरतेय; पण मग आपण आपल्या पुढच्या पिढीला अभिजात भाषेचे सौंदर्य शिकवणार तर कसे? उत्तर सोपे आहे - त्याच व्हॉट्‌सॲपमध्ये कॉपी-पेस्ट करून.

(उद्याच्या भागात - व्यसन शॉपिंगचे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT