सप्तरंग

सेलिब्रिटी वीकएण्ड : विकेंडला फक्त आराम!

एकता जैन

‘शगून’, ‘कही दिया जले कही रात’, ‘फॅमिली नं. १’, ‘एक थी राजकुमारी’, ‘शक लाका बुम बुम’ यांसारख्या मालिका व काही जाहिरातींमध्ये एकता जैनने काम केले आहे. काही हिंदी मालिकांसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून तिने काम केले आहे. हिंदीबरोबरच गुजराती मालिका आणि हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री कम डबिंग आर्टिस्ट एकता आपल्या वीकेंडबद्दल सांगते, ‘सतत शूटिंग असल्यामुळे आम्हाला वीकेंड असा नसतोच.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या लॉकडाउन आहे आणि सगळे दिवस वीकेंडसारखेच आहेत. तरीही मी माझे टाइम टेबल बनविलेले आहे. या दिवशी हे काम करायचे आहे, या दिवशी फेसबुक लाइव्ह करायचे आहे, या दिवशी किचनमध्ये काम अधिक करायचे आहे, असे माझे सगळे टाइम टेबल फिक्स असते.’  मी ड्रॉइंग, स्केचिंग आणि एम्ब्रॉयडरी करते. योगा, वर्कआउट करणे, माझी ही सगळी कामे ठरलेली असतात.

शनिवार किंवा रविवार या दिवशी आम्हाला सहसा सुटी मिळत नाही आणि मिळालीच तर रविवारी मिळते. मग सकाळी उशिरा उठते व वर्कआउटही करत नाही. तो दिवस खास आराम करण्याचा असतो. सतत धावपळ केल्यामुळे रविवारी सुटी मिळाल्यावर सहसा बाहेर जात नाही. मी शॉपिंग वेळ मिळाल्यास सोमवारी किंवा मंगळवारी करते, कारण त्या दिवशी बाजारात फारशी गर्दी नसते. हॉटेलात जाते, पण वीकेंड नाही, तर वीक डेला जाते. तेही जेथे छानपैकी गप्पा मारता येतील अशा हॉटेलात जाते. गडबड आणि गोंधळ असलेल्या ठिकाणी जात नाही. 

मॉलमध्येही वीक डेला जाते. रविवारी मोबाईलवर चित्रपट पाहते. कधी कधी थिएटर्सला जाऊनही चित्रपट पाहते. मैत्रिणींना भेटायचे झाल्यास शनिवारी आम्ही कॉफी शॉपमध्ये भेटतो. डिनरला खूप कमी वेळा मैत्रिणींबरोबर जाते. त्या वेळी आम्ही कोणत्याही विषयावर गप्पा मारतो. एखादा विषय निघाल्यावर त्यासंदर्भात सर्व प्रकारे, अगदी खोलवर चर्चा करतो. रविवारी मी सकाळी नाश्‍त्यासाठी बाहेरून इडली मागविते आणि दुपारी किंवा संध्याकाळी मी स्वतः काही तरी खास जेवण बनवते. गोडामध्ये गाजरचा हलवा किंवा अन्य पदार्थ बनवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT