Edu
Edu 
सप्तरंग

पीसीबी ग्रुप - करिअर नियोजन

सकाळ वृत्तसेवा

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
देशभरात आजही हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय एमबीबीएस शाखेची खरी क्रेझ आहे. दहावीच्या गुणांवर आपण प्रत्यक्ष करिअर निवडत नसतो, तर फक्त करिअरचे नियोजन करीत असतो व प्रत्यक्षात करिअरची निवड बारावी व सीईटी निकालानंतर केली जाते. 

पीसीबी ग्रुप 
दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठी प्रामुख्याने पीसीबी विषयाची निवड केली जाते. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अंदाज दहावीच्या गुणांद्वारे घेऊन हुशार विद्यार्थी फक्त पीसीबी विषय, परंतु मध्यम विद्यार्थी पीसीबीबरोबरच गणित हा पर्यायी विषय म्हणून निवडतात. दहावी निकालापूर्वीच हुशार विद्यार्थी कोटा, लातूर तसेच अनेक खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. बारावी परीक्षेसाठी मात्र आपल्याच राज्यातील, स्वतःच्या विभागातील कोणत्या तरी संस्थेत फक्त प्रवेश नावापुरता घेतात. 

आपली प्रगती तपासा 
दहावीनंतर प्रवेश घेतल्यानंतर आता जवळपास १८ महिने पूर्ण झाली आहेत व बारावी व सीईटी परीक्षा पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी विद्यार्थ्याने आपली प्रगती स्वतः तपासावी. आपण जे एमबीबीएस प्रवेशाचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते साध्य होण्यासाठीची प्रगती आहे का? नसेल 

तर पर्याय काय? 
याबाबत या दीपावलीच्या सुटीत एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे. दहावीचे गुण फसवे असतात. विषय न समजताही पाठांतराच्या जोरावर, ठरवून दिलेल्या पुस्तकामधीलच अभ्यासक्रम व साचेबंद प्रश्‍नपत्रिका यामुळे गुणांचा पाऊस पडतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामधील संकल्पनांचे आकलन झालेले नसल्यास अकरावीपासूनच घसरणीला सुरवात झालेली असते. 

या प्रश्‍नांची उत्तरे शोधा 
मागील अठरा महिन्यांच्या अभ्यासाचे प्रामाणिकपणे सिंहावलोकन केल्यानंतर मला बारावीमध्ये किती गुण मिळू शकतील तसेच मला नीट-२०२० मध्ये किती गुण मिळू शकतील याचा अंदाज घेतलाच पाहिजे.

अंतिम नीट-२०२० मध्ये किती गुण मिळतील याचा अंदाज घेताना सद्यःस्थितीत स्वतःच्या क्लासमध्ये मिळत असणाऱ्या गुणांची तुलना अत्यंत गांभीर्याने करावी. कारण, क्लासमध्ये मला ४०० च्या वर, ५०० च्या वर गुण मिळतात असे अनेक विद्यार्थी सहजपणे सांगतात. राज्यात शासकीय एमबीबीएसच्या सुमारे ४१०० जागा आहेत, पण त्याचबरोबर राज्यात ४१०० पेक्षा खासगी क्लासेस आहेत ही सुद्धा बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक खासगी क्लासमधील सद्यःस्थितीतील पेपरमधील काठिण्य पातळी समान नसते व पेपरच्या डिफीकल्टी लेव्हलनुसारच गुण कमी जास्त मिळत असतात, याची नोंद घेतली पाहिजे. 

नीट-२०२० मधील प्रवेश 
यंदा देशभरातील सर्व शासकीय, खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस, बीडीएससह बीएएमएस, बीएचएमएस व इतर सर्व शाखांचे प्रवेश नीट-२०२० मधील रॅंकनुसारच होणार आहेत. जेआयपीएमईआर व एम्स परीक्षा देखील यंदा रद्द झालेल्या असून नीट हीच एकमेव परीक्षा प्रवेशासाठी आहे. शासकीय एमबीबीएस प्रवेश मिळाला नाही, तर आर्थिक क्षमतेनुसार खासगी एमबीबीएस किंवा उच्च आर्थिक क्षमता असेल तर अभिमत एमबीबीएस प्रवेश मिळेल, परंतु आर्थिक क्षमता नसेल तर बीएएमएस, बीएचएमएस अशा उर्वरित शाखांची निवड निकालानंतरची परिस्थिती पाहून करावी. 

प्लॅन बी नुसार इतर पर्याय 
एमबीबीएस नाहीच मिळाले तर काय? म्हणून फार्मसी पर्याय खुला ठेवावा व त्यासाठी राज्याची एमएचटीसीईटी परीक्षा द्यावी. कृषी शाखेतील प्रवेशासाठी देखील ही परीक्षा उपयोगी पडते. नीटमधूनच पशुवैद्यकशास्त्राचे प्रवेश होतात. इतर पर्यायांमध्ये आयबीपी पुणे, आयआयएसईआर - भारतीय विज्ञान व शिक्षण संशोधन संस्था असे पर्याय निवडावेत. अर्थातच त्यासाठी बारावीमध्ये पात्रतेसाठी आवश्यक गुण मात्र मिळवावे लागतात. वरील पर्यायांसाठी या परीक्षांचे पुढील महिन्यापासून उपलब्ध होणारे ऑनलाइन फॉर्म भरणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष परीक्षांच्या निकालानंतर नीटमधून अपेक्षित प्रवेश मिळाला नाही, तर इतर पर्यायांमधून करिअर निवडणे सोईचे जावे म्हणूनच या महिन्यातच करिअरचे नियोजन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT