Education 
सप्तरंग

भारतातील शिक्षणपद्धती...

हेरंब कुलकर्णी

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षणविषयक अभ्यासक, फिनलंड
जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या दर गुरुवारी आपण जगभरातील काही देशांच्या शिक्षणपद्धतीचा त्यातील वैशिष्ट्यांचा आढावा घेत आहोत. आता आपण त्या सर्व देशांच्या शिक्षणपद्धती आणि भारतासंबंधी एकत्रित विचार करणार आहोत.

हा विचार करताना आपल्याला सर्वप्रथम भारतातील सध्याच्या शिक्षणपद्धतीची आणि होणाऱ्या बदलांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.  

भारतामध्ये सध्या शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांपैकी सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण. देशात २०१९मध्ये जाहीर झालेल्या या नव्या शैक्षणिक धोरणाचा विचार प्रत्येक भारतीयाने सखोलपणे करणे गरजेचे आहे. त्यातील अनेक बाबी या प्रगत देशांतील शिक्षणपद्धतींतील उत्तमोत्तम बाबींप्रमाणे आहेत आणि भारतासाठी अत्यंत उपकारकही आहेत. या धोरणाचा आपण भारतीयांनीही पुरस्कार करायला हवा.

या धोरणाविषयी थोडक्यात जाणून घ्यायचे झाले, तर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे उदयोन्मुख शिक्षणरचना. या धोरणांतर्गत शिक्षणाची रचना ५+३+३+४ वर्षे अशी केलेली दिसते. संपूर्ण शिक्षणामधील अंगणवाडी-शिशुवर्ग इत्यादी स्तरांतील शिक्षण हे शासकीय तऱ्हेने पार पडावे अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे वय वर्षे ३ ते ६ च्या बालकांचे अंगणवाडी ते दुसरी इयत्तेपर्यंतचे शिक्षण हा ५ वर्षांचा शिक्षणाचा पहिला टप्पा ठरेल. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीला अर्ली-चाइल्डहूड-सिस्टिम म्हटले जाते. या स्तरातील शिक्षणाला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा पाया मानत असल्याने सर्वच प्रगत देशांत या प्रकारच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. आता नवीन धोरणानुसार भारतही याच पद्धतीने प्रगतिशील राहणार आहे. तिसरा टप्पा पुन्हा ३ वर्षांचा सहावी, सातवी, आठवी इयत्ता आणि शेवटचा चौथा टप्पा ज्यात इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी या चार वर्षांचा अंतर्भाव असेल. ही अशा रचना करण्यामागचा उद्देश मूलतः

१) पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्याचा मेंदूचा पूर्ण विकास होणे.
२) दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने औपचारिक शिक्षणासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या तयार करणे.
३) तिसऱ्या टप्प्यात औपचारिक शिक्षणाला सुरवात आणि त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या वापरला उद्युक्त करणे आणि साध्य करणे.
४) चौथ्या टप्प्यात म्हणजेच ९ वी ते १२ वी या वयात एकमेकांवर आधारित विषय, अधिक सखोल विचार, स्वकृतीतून शिक्षण, अशी ध्येये सिद्ध करणे.

हे चार टप्पे करण्यामागचा हेतू असेल तर ही चार टप्प्यांची रचना अत्यंत अभिनंदनीय आहे. भारताच्या या नव्या धोरणातील काही अजूनही बाबी पुढील लेखात पाहूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT