france
france 
सप्तरंग

वीकेंड हॉटेल : चटकदार चवीचे मेक्‍सिकन!

नेहा मुळे

वीकेंड हॉटेल

मेक्‍सिकन फूड त्याच्या चटकदार चव आणि अनोख्या रेसिपीमुळे जगभर आवडीचं खाद्य ठरलं आहे. या पदार्थांतील चटकदारपणाबरोबरच त्यातील फ्रेश आणि वेगळ्या घटकांमुळं ते सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे. या घटकांचा उल्लेख करायचा झाल्यास बीन्स, आवोकाडोज, टोमॅटो, चिली, इतर विविध भाज्या आणि वेगवेगळे मांसाचे प्रकार अशी नावे घेता येतील. यातला चवीचा घटक असतो तो वेगवेगळ्या घटकांचं एकत्रीकरण करून तयार केलेला सालसा आणि ड्रेसिंग (चटणी किंवा मसाल्याचे प्रकार). यातील अधिकाधिक घटकांच्या समावेशामुळे मेक्‍सिकन पदार्थ प्रोटिन, व्हिटॅमिनयुक्त अर्थात पोषक बनतात.

टेक्‍स-मेक्‍स क्‍युझिन हा मेक्‍सिकन फूडचा पुढचा टप्पा म्हणता येईल. टेक्‍सासमधील "टेक्‍स' आणि मेक्‍सिकनमधील "मेक्‍स' असा तयार होतो टेक्‍स-मेक्‍स. थोडक्‍यात टेक्‍स-मेक्‍स हे अमेरिका आणि मेक्‍सिकन फूडचं फ्युजन आहे. हे फ्युजन जगभरात सगळीकडं प्रसिद्ध झालं आहे.
पुणेकरांसाठी अलीकडच्या काळात मेक्‍सिकन फूड नवीन राहिलेलं नाही. नाचोज, टाकोजसारख्या पदार्थांची ओळख हॉटेल शिवसागर (जंगली महाराज रोड), दर्शन (प्रभात रोड) यांनी खूप वर्षांपूर्वी पुणेकरांना करून दिली. नाचोज, टाकोज या पदार्थांपेक्षा वेगळेही अनेक प्रकार मेक्‍सिकन फूडमध्ये असतात, ज्यांची चव घ्यायलाच हवी.

एनचिलाडाज : पोळीच्या (तोर्तिया) रोलसारखा, मात्र आकाराने मोठा रोल असं याचं वर्णन करता येईल. हा रोल मक्‍याच्या पीठापासून तयार केलेला असतो. या रोलमध्ये असतं वेगवेगळ्या प्रकारचं मांस, विविध भाज्या, बटाटे, चीज, बीन्स यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं मिश्रण. मिश्रणासह तयार झालेल्या रोलवर चिली पेपर सॉस घातला जातो.

बरिट्टो : बरिट्टोचा रोल मैद्याचा आणि आकाराने खूप मोठा असतो. मांसाचे वेगवेगळे प्रकार आणि बीन्स हे मेक्‍सिकन फूडमध्ये वारंवार वापरले जाणारे घटक आहेत, पण अमेरिकेत यात आणखी विविधता आणली जाते. तिथल्या रोलमध्ये भात, बीन्स, सालसा, लेट्युस, ग्वाकामोली, सॉर क्रीम, मांसाचे प्रकार, विविध भाज्या असतात. बरिट्टो रोलमध्ये मिळतो तसा राइस बाऊलच्या स्वरूपातही मिळतो. यामध्ये रोलमधील मिश्रणाचेच सर्व घटक भाताबरोबर दिले जातात.

केसेडिया : हा प्रकार काहीसा आपल्याकडील गुळाच्या पोळीसारखा असतो, पण गोड नसतो. यात गुळाऐवजी असतं चीज. काही वेळेस त्यामध्ये मश्रूम, कॉर्न, हॅलपिनोज असे वेगवेगळे घटक घालतात. दोन पोळ्यांमध्ये (तोर्तिया) सारण भरून तयार होते कॅसेडिया किंवा एकाच पोळीची घडी करून त्यातही सारण भरलं जातं. सालसा किंवा ग्वाकमलीबरोबर कॅसेडियाची चव काही औरच लागते.

बरेचसे घटक एकसारखे असले, तरी मेक्‍सिकन फूडचा प्रत्येक प्रकार चवीचा असतो. फहिता, टोस्टाडा, मोलेह, एम्पनाडा, पोझोल, चिमिचांगा या मेक्‍सिकन किंवा टेक्‍स-मेक्‍स प्रकारातील पदार्थांची चवही घेऊन बघा...

मेक्‍सिकन पदार्थ मिळणारी पुण्यातील काही निवडक ठिकाणं -
चिलीज : विमाननगर
स्ट्रीट मीट : कोरेगाव पार्क
मेक्‍सिकन रोडिओ : कल्याणीनगर
फूड ट्रक : औंध
पोलका डॉट्‌स : औंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT