Book
Book 
सप्तरंग

क्‍लॅरिटी इज पॉवर!

माधव गोखले

बुकीश - माधव गोखले
इतिहासाच्या पानांमध्ये चारच दिवसांपूर्वी जाऊन बसलेलं २०१९ अनेकांसाठी अनेक अर्थांनी अनेकविध भावभावनांचं, घटना-घडामोडींचं वर्ष होतं. तशी जाणारी सगळीच वर्षं अशीच असतात, पण २०१९ दुसऱ्या सहस्रकातल्या पहिल्या शतकातलं शेवटचं टीन इयर होतं. थर्टीन ते नाइन्टीन. ही वर्षं अनेक अर्थांनी महत्त्वाचीच! या पुढची टीन इयर्स अवतरतील ती चौऱ्याण्णव वर्षांनी. या शतकाबरोबर सहस्रकाचं विशीत पदार्पण होत असताना, काही पुस्तकं मात्र काही काळ मनात रेंगाळतील. 

खरंतर एखाद्या वर्षातली गाजलेली पुस्तकं कोणती, हा प्रश्नच अवघड आहे. या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिगणीक बदलत जातं. पुस्तकांपुरतं बोलायचं तर ‘बेस्ट बुक्‍स ऑफ द ईयर’च्या वेगवेगळ्या याद्यांचा हा एक मार्ग असू शकतो. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द गार्डियन’, ‘टाइम’, ‘न्यूयॉर्कर’ अशा मंडळींच्या याद्यांवर नजर टाकली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या त्या वर्षात कोणत्या लेखकांच्या कोणत्या पुस्तकांची चर्चा झाली, त्याचा अंदाज येतो. दुसरा मार्ग अर्थातच सन्मान मिळवलेल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा. 

अशा वेगवेगळ्या याद्या पाहताना मला एका पोस्टरची आठवण येते. एका अनामिकानं सांगितलेलं शाश्वत सत्य मनात रुतून बसलं. भिंतभर पसरलेला एक बुकशेल्फ ते शाश्वत सत्य आपल्यासमोर ठेवतो - ‘रीडिंग कॅन सीरियसली डॅमेज युवर इग्नरन्स.’ वाचनामुळे तुमच्या अज्ञानाला, अजाणतेपणाला, अपरिपक्वतेला गंभीर इजा होऊ शकते. मी वेळ मिळेल तेव्हा पुस्तकांच्या दुकानांत, ग्रंथालयांत जातो. रस्त्याकडेच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगांशी रेंगाळतो, पुस्तकांच्या प्रदर्शनांमध्ये पुन्हा पुन्हा डोकावतो. दरवेळी पुस्तकं पाहाताना आणखी कितीतरी वाचायचंय हाच विचार मनात डोकावत राहातो.  

गेल्या वर्षी वाचलेल्या पुस्तकांमधली युवाल नोआह हरारी यांचं ‘ट्‌वेन्टी वन लेसन्स फॉर ट्‌वेन्टीएथ सेंच्युरी’, आमिष त्रिपाठींच्या ‘रामचंद्र’ सीरिजमधलं ‘रावण -एनिमी ऑफ आर्यावर्त’, शोधपत्रकार रितू सरीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं ‘पनामा पेपर्स’, रवी आमलेंचं ‘रॉ’, जयराम रमेश यांचं पी. एन. हक्‍सर आणि इंदिरा गांधी यांच्यावरचं ‘इन्टरट्‌वाईन्ड लाईव्हज्’, रंगनाथ पठारे यांचं ‘सातपाटील कुलवृत्तांत’, रामचंद्र गुहांचं ‘गांधी - द इयर्स दॅट चेन्ज्ड द वर्ल्ड’, प्रणव रॉय - दोराब सोपारीवाला जोडीचं ‘द व्हर्डिक्‍ट - डिकोडिंग इंडियाज इलेक्‍शन्स’ आणि ऍन्ड्र्यू ओटीस यांचं ‘हिकीज्‌ बेंगाल गॅझेट - द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर’ ही लक्षात राहिलेली काही पुस्तकं. 

‘ट्‌वेन्टी वन लेसन्स...’ वाचायला घेतल्यावर पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या हरारी यांच्या पहिल्याच वाक्‍याशी थांबल्याचं आठवतंय. ‘इन अ वर्ल्ड डिल्यूज्ड बाय इररिलेव्हन्ट इन्फर्मेशन क्‍लॅरिटी इज पॉवर’ - असंबद्ध, अप्रासंगिक माहितीच्या महापुरात सापडलेल्या जगात स्पष्टता असणे, हेच खरे सामर्थ्य आहे. मग पुढचे खूप दिवस हे पुस्तक पुरलं. 
वाचत राहू आपण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT