book
book 
सप्तरंग

बुकीश : विरामचिन्हे..!!

माधव गोखले

एक पांडा एकदा हॉटेलात जाऊन सॅंडविच मागवतो. खाऊन झाल्यावर कंबरेचं पिस्तूल काढून दोन गोळ्या हवेत उडवतो आणि जायला लागतो. पांडाला सॅंडविच आणून देणाऱ्या वेटरला समजत नाही, हा असं का करतोय ते. तो विचारतो, ‘तू असं काय करतोयस; पांडा असं वागत नाहीत कधी...’ हातातली पुस्तिका त्याच्या अंगावर फेकत पांडा म्हणतो, ‘हे वाच.’ विरामचिन्हांच्या वापराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत लिहिलेल्या त्या पुस्तिकेत एक नोंद असते - ‘पांडा - एक मोठ्या आकाराचा काळा-पांढरा अस्वलासारखा सस्तन प्राणी, मूळ वास्तव्य चीनमध्ये. ‘इट्‍स, शूट्‍स, ॲण्ड लिव्हज्‌’ (खातो, गोळ्या घालतो आणि निघून जातो.)’ विरामचिन्हांसकट वाक्‍य पुन्हा वाचलं की लक्षात येतं. गोंधळ झालाय तो जास्तीच्या स्वल्पविरामांमुळे वरच्या वाक्‍यातले ‘इट्‍स’ आणि ‘शूट्‍स’ शब्दानंतरचे स्वल्पविराम काढून वाक्‍य पुन्हा वाचा- ‘पांडा - ... इट्‍स शूट्‍स ॲण्ड लिव्हज्‌’ (पांडा {बांबूचे} कोवळे कोंब आणि पाने खातो.) 

खेळकर ठामपणे विरामचिन्हांचा आग्रह अधोरेखित करणारं लीन ट्रस या ब्रिटिश पत्रकार-लेखिकेचं ‘इट्‍स, शूट्‍स ॲण्ड लिव्हज ः द झीरो टॉलरन्स ॲप्रोच टू पंक्‍च्युएशन’ हे पुस्तक लिखाण अर्थवाही करण्यासाठी योग्य जागी योग्य विरामचिन्हे का यावीत, हे सांगत जातं. असंच आणखी एका वाक्‍याचं उदाहरण नेहमी दिलं जातं. विरामचिन्हे आणि त्यांच्या जागा बदलल्या तर वाक्‍याचा अर्थ किती बदलतो याचं. ‘अ वुमन, विदाऊट हर मॅन, इज नथिंग,’ विरामचिन्हे बदलून आता हेच शब्द पुन्हा वाचा ‘अ वुमन ः विदाऊट हर मॅन इज नथिंग.’ यावर आणखी काही टिप्पणी करण्याची आवश्‍यकता आहे, असं वाटत नाही. मराठीतही आचार्य अत्रे यांच्या भाषाप्रभुत्वाचे दाखले देताना याच पद्धतीची उदाहरणे दिली जातात. 

विरामचिन्हांचा योग्य वापर म्हणजे विचार स्पष्ट असल्याचे चिन्ह आणि कारणही, असे लीन विरामचिन्हांच्या वापराबद्दल म्हणतात. त्यांचं हे म्हणणं पुस्तक वाचताना पटत जातं. एकोणिसाव्या शतकातले लेखक-विचारवंत व्हिक्‍टर ह्युगो यांचा या पुस्तकातला किस्साही असाच अफलातून आहे. त्या काळात तारा पाठवताना विरामचिन्हांना पैसे मोजावे लागत नसत. या नियमाचा फायदा घेत ‘ले मिझेराब्ल’ प्रकाशित झाल्यानंतर ह्युगो यांनी त्यांच्या प्रकाशकाला कादंबरीच्या खपाची विचारणा करणारी तार पाठवली. त्यांनी ‘?’ हे चिन्ह फक्त पाठवलं. प्रकाशकही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारा. त्याच्याकडून उत्तर आलं, ‘!’. 

लिखाणासंबंधीच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षावर बोट ठेवणाऱ्या ट्रस यांच्या पुस्तकाला वाचकांची पसंती मिळाली. काही काळ ते न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्याही यादीत होतं. पुस्तकावर टीका झाली, त्याची खिल्ली उडवणारं एक पुस्तकही नंतर प्रसिद्ध झालं. तरीही भाषेच्या अभ्यासकांना एक वेगळा दृष्टिकोन देणारं आणि वाचताना काही वेळा चेहऱ्यावर हसू आणणारं हे पुस्तक आवर्जून नोंद घ्यावी, या सदरात नक्की बसतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT