Mokale-Vha
Mokale-Vha 
सप्तरंग

#MokaleVha : धडा मितभाषेचा....

माधवी जगताप, हडपसर

कधी साधे, सोपे वाटणारे वागणे बरंच काही शिकवून जाते. शब्दांचा वापर, प्रहार, निःशब्दता, मार्मिक किंवा अगदी मोजके बोलणे बऱ्याचदा चार माणसांवर प्रभाव पाडते आणि कृतीपेक्षा, बोलघेवडेपणा बरंच काही करून जातो, ते ही कळत-नकळत, अगदी सहजच.

खचाखच भरलेल्या एसटीत बसणे म्हणजे निव्वळ सर्कस. त्यात आधीच सीट पकडून ऐसपैस बसलेले तर संसदेत सीट मिळाल्याप्रमाणे घट्ट बसतात. त्यातच वाहक आणि प्रवासी यांच्यात वादावादीचं एकच कारण म्हणजे सुट्टे पैसे. डबलबेल झाली आणि गाडी निघाली. गर्दीचा एकच फायदा की करकचून ब्रेक दाबला तरी कोणीच तोंडावर पडत नाही. तिकीट-तिकीट म्हणताच, एका आजोबांनी अर्ध्या तिकिटासाठी अख्खी नोट काढली. वाहकाच्या उत्तराला प्रत्युत्तर द्यायला आजोबा तयारीनिशीच होते; पण व्यर्थ! वाहकाने काहीही न बोलता नोट घेत तिकिटावर राहिलेल्या पैशाचा तपशील लिहून तिकीट दिले. आता काय सर्वांनी नोटा दाखवायला सुरुवात केली. हातातले सुटे पैसे परत ठेवून दिले. वाहकाच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही पण त्याने आपला शांतपणा-संयम काही सोडला नाही. सर्वांना तिकीट दिले पण राहिलेले पैसे कोणालाच न देता, हे बघा सुट्टे झाले की देतोच, एवढेच हसत सांगितले. 

थंड झुळकीबरोबर बरेच जण डुलक्‍या घेऊ लागले. थोड्या वेळाने एक-एक थांबा जवळ येऊ लागला, तसतसा एकेक प्रवासी उठून कंडक्‍टरला राहिलेल्या पैशाची तिकीट दाखवत आठवण करू लागला. त्यावर वाहकाने फक्त हातातल्या नोटा दाखवल्या अन्‌ नकारात्मक मान हलवली. नाइलाजास्तव प्रवाशांनी वाहकाला आपल्याकडील सुट्टे पैसे दिले अन्‌ परत आपली नोट परत घेतली, ते पाहून इतर प्रवासी पण खिसे-पाकिटे चाचपून सुट्टे पैसे शोधून कंडक्‍टरकडे स्वतःहून पोचले व हिशेब पूर्ण करत होते.

वाहकाच्या सौजन्यशीलतेचा नकळत परिणाम झाला आणि त्याचे काम सोपे झाले. ते वादाविना मनोमन त्याचे विशेष कौतुक वाटले. सर्वच गोष्टी बडबडण्याने साध्य होत नाहीत, हेच यातून समजले. आयुष्याचंही असंच असतं ना? प्रत्येक ठिकाणी जशास तसे, ठोशास ठोसा देऊन चालत नाही. कारण वादाने वादच वाढणार. ताणाने ताणच वाढणार. शांतपणानेही बरीच कामे होतात. आरेला कारे हे उत्तर मिळणारच. मी-मी बाजूला ठेवून डोक्‍यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली की सारं काही आलबेलच आहे.

माघार घेणे, हे बऱ्याचदा कमीपणाचे मानले जाते. पण, कमीपणा घेण्यासाठी फार मोठे मनोधैर्य असावे लागते. संयम आणि सहनशीलता असावी लागते. आपलीही जनमानसात एक चांगली प्रतिमा तयार होते, हेही नक्कीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT