सप्तरंग

वीकएण्ड हॉटेल :  बिर्याणी - एक क्‍लासिक डिश

नेहा मुळे

बिर्याणी म्हणजे क्‍लासिक डिश. बिर्याणीची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. ही डिश सर्व भारतीयांना अगदी मनापासून आवडते. स्थानिक चव आणि बनवण्याच्या विविध पद्धतींमुळं बिर्याणीचं स्वरूप बदलत गेलं आणि या चवीमुळं आपले टेस्ट बड्‌स तृप्त होत गेले. बिर्याणीची चव, मसाले आणि अरोमा याला भारतीय पाककलेचा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही.

बिर्याणी भारतीय डिश वाटत असली, तरी वास्तवात तिचा जन्म दूरचा आहे. ‘बिरिअन’ आणि ‘बिरिंज’ या फारसी शब्दापासून बिर्याणी हे नाव पडलं. ‘बिरिअन’चा अर्थ होतो, स्वयंपाक करण्याआधी तळलेला आणि ‘बिरिंज’ म्हणजे भात. बिर्याणी भारतात कशी आली याबद्दल अनेक आख्यायिका असल्या, तरी मुख्यतः असे मानले जाते की बिर्याणी भारतात पश्‍चिम आशियातून आली. 

बिर्याणीच्या उत्क्रांतीमध्ये अनेक शतके, अनेक संस्कृती, अनेक घटक आणि पाककृतीच्या अनेक शैली आहेत. सैन्यातून बनवलेल्या डिशपासून ते रॉयल्टीसाठी योग्य, असा हा प्रवास आहे. बिर्याणीचे विविध प्रकार उत्क्रांतीच्या स्थानिक क्षेत्रातील स्थानिक अभिरुचीनुसार, परंपरा आणि गॅस्ट्रोनोमिक इतिहास दर्शवितात.

बिर्याणी आज कम्फर्ट फूड झालंय. काही मसालेदार किंवा नॉन-व्हेज खाण्याची हुक्की आल्यास बिर्याणी हमखास खाल्ली जाते. समारंभ किंवा गेट-टुगेदर असल्यास बिर्याणीच मागवली जाते. याचं कारण हा सगळ्यांचा आवडता आणि पोटभरीचा पदार्थ आहे. पुणेकर खवय्यांची बिर्याणी खास आवडती आणि खाण्याची ठिकाणंही ठरलेली. यातील काही निवडक ठिकाणांचा हा धांडोळा...

 एसपीज्‌ बिर्याणी हाउस (सदाशिव पेठ, टिळक रोड) : पुण्यातील बेस्ट बिर्याणी म्हणून एसपीज्‌चं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांची साजूक तुपातली चिकन आणि मटण बिर्याणी नॉन-व्हेज प्रेमींसाठी पर्वणीच.

ब्लू नाईल (कॅम्प) : कॅम्पमध्ये फिरायला गेल्यास ब्लू नाईलच्या बिर्याणीचा बेत ठरतोच. कायम असंख्य गर्दी असली तरी थांबून, इराणी चिकन बिर्याणी खाऊनच जाणारे लोक अनेक आहेत.

नवाब एशिया (बालेवाडी, हायस्ट्रीट) : खास मुघलाई जेवण मिळणारं हे ठिकाण. इथं बिर्याणीचे अनेक प्रकार चाखायला मिळतात. उदा. ः मेथी चमन बिर्याणी, मुर्ग नूरमहल बिर्याणी, कच्छे गोश्‍त की बिर्याणी आणि इतर. 

तारीफ (औंध) : बिर्याणीची अस्सल चव इथं चाखायला मिळेल. इथले बाकीचे पदार्थ प्रसिद्ध असले, तरी बिर्याणीच सर्वाधिक सरस आहे. चिकन बिर्याणीची चव नक्की चाखण्यासारखी. 

जॉर्ज रेस्टॉरंट (कॅम्प) : पुण्यातील बेस्ट बिर्याणीच्या यादीत हे नाव अनिवार्य आहे. अस्सल पर्शियन स्टाइल बिर्याणीची चव इथे चाखायला मिळते.

तिरंगा नॉन-व्हेज (कोथरूड) : इकडची मटण बिर्याणी आणि चिकन बिर्याणी लोकांच्या खास आवडीची. अनेक वर्षांपासून यांच्या बिर्याणीच्या ‘लोकल टच’मुळं अनेक चाहते बनले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT