Birds 
सप्तरंग

नोंद : हिरवा कोपरा

प्रज्ञा देशमुख

लॉकडाउन थोडाफार सुसह्य होतो, तो घराभोवती असणाऱ्या छोट्याशा बागेमुळंच! कोरोनाच्या भीतीचे सावट असताना निर्धास्तपणे फिरायला एवढीच जागा शिल्लक आहे!

अंगोपांगी कळ्या ल्यालेली, नेहमीच्या डौलात बहरायला सुरुवात झालेली मधूमालती, निळसर जांभळ्या रंगाची, महाभारतातील पात्रांना सामावून घेणारी, गोडसर मादक सुगंधाची, श्रीकृष्णाची आवडती, डोळे निववून टाकणारी कृष्णकमळाची फुलं, सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढेल तसं थुई थुई नाचणारं आणि खाली असणाऱ्या लाल, गुलाबी आणि पांढऱ्या बिगोनियाला भर उन्हातही थेंबांच्या स्पर्शाने उल्हसित ठेवणारं इवलसं कारंजं, सूर्याची दाहकता वाढेल तसं तशी दिवसागणिक आकर्षक होत जाणारी बोगनवेल, लिंबाच्या सावलीत विसावलेली, पांढरे फणे काढून खुणावणारी नागफणी (पीस लिली), जागा मिळेल तसा अस्ताव्यस्त पसरलेला गर्द निळ्या फुलांचा गोकर्ण, लाल, नारंगी, गुलाबी अशा दिलखेचक रंगांची मुक्त उधळण करणारी जास्वंद, दोन फूट बाय सहा फुटाचा टँकदेखील थिटा वाटून बाहेर सैलावलेली वॉटर लिलीची पानं आणि या पानांच्या गर्दीतून डोकं वर काढून तोऱ्यात फुलणारी जांभळ्या, अबोली आणि गुलाबी रंगाची वॉटर लिली जे अवर्णनीय नेत्रसुख देते, ते शब्दातीत आहे! जोडीला पपई, कढीपत्ता, लिंबू, तुळस, पुदिना रोजच्या दिमतीला आहेच!

या सगळ्या चित्राला जिवंतपणा आणतात ते दाणापाण्यासाठी बागेत येरझाऱ्या घालणारे पक्षी! दोन पिल्लासह येणारी लालगाल्या बुलबुलची जोडी फिडरमधील चुरमुरे पिल्लांना भरवून, मनसोक्त आंघोळ करून, संधी मिळेल तसं पपईवर ताव मारून जाते. लालबुड्या बुलबुलला भलतीच घाई असते, कर्कश्य आवाज काढून बाकी पक्षांना हुसकावून, खाऊन पिऊन स्वारी लगेच गायब होते! विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फॅन टेलची सुरेल शीळ कान तृप्त करून जाते! याला मराठीत ‘नाचरा’ असं  म्हणतात, ते उगाच नाही!

फुलवलेला शेपटाचा पंखा घेऊन सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं आणि स्वतः भोवती गिरक्या घेत, ‘चक् चक्’ आवाज काढत राहायचं हा त्याचा आवडता छंद! दिवसातून दोन-तीन वेळा तरी आंघोळीसाठी येतो. संध्याकाळी उशिरापर्यंत रॉबिन (दयाळ) घालत असलेली शीळ देखील ऐकण्यासारखी असते. रॉबिन एक नंबरचा नकल्या आहे, झाडावर बसल्या बसल्या अनेक पक्षांचे आवाज काढतो. बरेच पक्षी आहेत, असा भास होतो.

बाहेर जाऊन बघावं, तर हाच आपला वेगवेगळे आवाज काढत बसलेला असतो! फिडरमधील चुरमुरे खायला चिमणा-चिमणी देखील येतात, आकारानं मोठ्या असलेल्या बुलबुलला यांचा भारी धाक! या चिमण्या बुलबुलला हाकलून लावतात आणि स्वतःचा पोटोबा झाल्याशिवाय त्यांना फिडरवर बसूही देत नाहीत! स्केली ब्रेस्टेड मुनियांची तर गंमतच न्यारी! हे पक्षी चिमणीपेक्षा किंचित छोटे, त्यांचं डोकं ब्राऊन रंगाचं असून पोटावर खवल्या खवल्यासारखं डिझाइन असतं. मी मध्ये त्यांच्यासाठी राळ (एक प्रकारच तृणधान्य) ठेवत असे खायला, दहा पंधरा मुनियांचा थवा एक एक करून खाली उतरत असे आणि थोड्या वेळातच सगळ्याचा फडशा पाडत असे. असं दिवसातून चार पाच वेळा होई! जिवाच्या भीतीपोटी पाणी पितांनाही गिरकी घेऊन आजूबाजूचा अंदाज घेणाऱ्या, डोळ्याभोवती चष्म्याचा भास व्हावा अशा पांढऱ्या रंगाचं वर्तुळ असणाऱ्या हिरवट पिवळ्या रंगाच्या, इवल्याशा ओरिएंटल व्हाईट आय (चष्मेवाला) देखील हजेरी लावून जातात! ‘कूप कूप’ असा घुमणारा आवाज काढणारा आणि भारद्वाज त्याचबरोबर पाणी पिऊन फांदीवर निवांत बसून खाल्लेल्या फळांच्या बिया तोंडातून बाहेर काढणाऱ्या कोकिळा/कोकीळ, छोट्या छोट्या उड्या मारत, किडे आणि मध खाण्यासाठी सगळी बाग पिंजून काढणारे ऍशी प्रिनिया आणि टेलर बर्ड हे पिटुकले पक्षी, चिमणीची बहीण शोधावी अशी राखाडी ग्रे-टिट, फुलाफुलांमध्ये मकरंद शोधत फिरणारे सनबर्ड, तर कधी कधी अनाहूत पाहुण्यासारखे येणारे किंगफिशर, ड्रोंगो (कोतवाल) आणि पॉन्ड हेरॉन हे सगळे पक्षी म्हणजे बागेच चैतन्यच! 

भोवतालच्या परिस्थितीनं दाटून आलेलं नैराश्याचं मळभ दूर करायला घरात एक तरी हक्काचा असा हिरवा कोपरा हवाच! जो तुमच्यात नव्यानं चैतन्य जागृत करेल आणि साचलेली नकारात्मकता सकारात्मकतेत परिवर्तित करेल! आजच्या घडीला पैसाअडका, दागदागिने यां पेक्षा मोकळा श्‍वास घ्यायला टीचभर जागा असणं यासारखी श्रीमंती ती कुठली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT