सप्तरंग

आहाराबाबतचे सोपे नियम (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी

हेल्थ वर्क
भौगोलिक परिस्थितीनुसार मानवाचा आहार बदलतो. एस्किमो लोक त्यांच्या उभ्या आयुष्यात पालेभाजी म्हणजे काय, ते पाहतसुद्धा नाहीत. त्यांचा आहार मासे, रेनडिअरचे मांस हाच असतो. त्यांना कुणी चौरस आहार देण्याचा प्रयत्न केला आणि ‘एक पालेभाजी, वाटीभर उसळ, एक आंबट, एक गोड फळ खा,’ असा उपदेश केल्यास ते हसतीलच! त्यामुळे आपल्या आहाराबद्दल काही सोपे नियम लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

१. शारीरिक परिश्रम तुमचा आहार ठरवतात. तुमचे वजन वाढत असल्यास तुम्ही अनावश्‍यक खात आहात. 

२. ताकदीचे व्यायाम करत असल्यास प्रथिनांचा समावेश जास्त लागेल. त्यात अंड्याचा पांढरा भाग, डाळी, कडधान्ये, दूध, मांस, मासे यांचा समावेश होतो. 

३. दमश्‍वासाचे व्यायाम करत असल्यास कार्बोडायड्रेट्‌स आहारात जास्त लागतील. 

४. प्रत्येक मोसमातील सर्व फळभाज्या, पालेभाज्या, फळे भरपूर खा.

५. भलत्या मोसमात भलत्या गोष्टी कृत्रिमरीत्या टिकवून खाणे शक्‍यतो टाळा.

६. नैसर्गिक पदार्थांचे प्रमाण आहारात जास्त असू द्या.

७. त्या-त्या देशात तेथील माणसांप्रमाणे खा. उगाच तोंड वेंगाडून ‘वरण-भाताची’ आठवण करू नका.

८. खायचे ते आनंदाने खा. आज तुम्हाला खायला मिळते, त्यामागे ते अन्न पिकविणारे शेतकरी, मजूर त्यांचे श्रम असतात. त्यांची आठवण ठेवा. 

९. आज समोर अन्न म्हणून आहे, ते उद्या तुमच्याच शरीराचा भाग होणार आहे. त्याचे आनंदाने स्वागत करा!

(पुढील भागात वाचा - विश्रांती आणि व्यायाम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT