सप्तरंग

मुलांना करा अंतर्मुख (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी

हेल्थ वर्क
आपण दहा ते बारा वर्षांच्या मुलांना जमतील तेवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यात ओरिगामीपासून क्रिकेटपर्यंत काय वाट्टेल ते असले पाहिजे. मुले ठरवतील ती गोष्ट आपली आर्थिक कुवत पाहून त्यांना करू द्यावी. आर्थिक कुवत नसल्यास मुलांना नीट सांगितल्यावर समजते. या वयामध्ये मुलांना हालचालींतील मजा कळणे आवश्‍यक आहे. तसेच, एखादी गोष्ट स्वतंत्रपणे बनवण्यातील मजा दुसऱ्याने बनविलेल्या गोष्टीत नाही, हेही समजणे आवश्‍यक आहे.

एकदा हालचालीतील मजा कळल्यावर व्यायाम जुलमाचा रामराम न होता एक अत्यंत आनंददायक गोष्ट होते. शरीराची निगा राखणे हा सहजस्वभाव होतो. सर्वत्र खेळाआधी व्यायाम शिकविण्याची घाई झालेली दिसते. आपली फुटबॉलची किक लांब जात नाही. ती लांब जाण्यासाठी मुले आनंदाने ताकदीचे व्यायाम करतात. सिंहगड चढताना आपल्याला दम लागतो आणि आपण मागे पडतो, हे दूर करायला दमश्‍वासाचे व्यायाम करायला मुले तयार होतात. झाडावर चढताना आपला पाय वरच्या फांदीवर जात नाही, हे समजल्यावर मुले लवचिकपणाचे व्यायाम उत्साहाने करतात. बारा ते चौदा या वयोगटातील मुले ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या विचित्र वयात असतात. त्यांना काही सांगायला गेले, तर त्यांना माहीत असते आणि त्यांना काही विचारले तर माहीत नसते. त्यामुळेच, अशा वेळी मुलांना अंतर्मुख करणे महत्त्वाचे ठरते. 

(येत्या सोमवारच्या (ता. २०) अंकात ः अनंत प्रश्‍नांची उत्तरे देणारी सुटी)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT