Sunrise-Beauty 
सप्तरंग

सौंदर्य सूर्योदयाचे...

सकाळ वृत्तसेवा

व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, सॉफ्ट स्किल प्रशिक्षक
आठवड्याच्या शेवटी, शनिवारी संध्याकाळी मी एका परिचिताला भेटलो. आमच्या नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याने विचारले, ‘‘तुम्ही रविवारी काय करता?’’ मी त्याला प्रतिप्रश्‍न करत म्हणालो, ‘‘का? माझ्यासाठी रविवार आणि बाकीच्या दिवसांमध्ये फारसा फरक नाही.

कारण महिन्यातील फार थोडे दिवस मी काम करतो, हे तुला महीतच आहे. तुझ्याबद्दल काय?’’ तो म्हणाला, ‘‘काहीही नाही. मी रविवारी उशिरापर्यंत झोपतो. आराम करतो. आणखी काय करणार?’’ मी त्यावर त्याला विचारले, ‘‘तू शेवटचा सूर्योदय कधी पाहिलास?’’ दररोजच्या सूर्योदयाचे दृश्य हे आनंद, प्रकाश, ऊर्जेची सोनेरी किरणे जगभरात पसरवणारे कदाचित सर्वांत सुंदर दृश्य असेल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘ओह, मला खरेच आठवत नाही. सूर्योदय पाहण्यासाठी वेळ तरी कुठे असतो. प्रत्येकालाच सर्व प्रकारचे ताणतणाव बाळगत दररोज कार्यालय गाठावे लागते.’’ मी त्याला समजावत पुन्हा म्हणालो, ‘‘निश्‍चितच. त्यामुळेच तुला सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहायला आवडला तर पाहा.

सकाळी पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट शांतपणे ऐकण्याचा आणि ताजीतवानी फुले पाहण्याचा आनंद काही वेगळाच. होय, तुला तुझा झोपेचा कालावधी पूर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे, रविवारी तू दुपारी झोपू शकतोस. तुला काय वाटते?’’ माझ्या बोलण्यावर क्षणभर विचार करून स्मितहास्य करत तो म्हणाला, ‘‘ही कल्पना चांगली वाटते. पाहतो काय करता येईल ते.’’ त्याच्या आवाजाच्या पट्टीवरून मी तो रविवारीही सूर्योदय पाहणार नाही, हे मी ओळखले. घडलेही तसेच. त्याने अशी एखादी सुंदर सकाळ पाहिली नाही. आपल्यापैकी कित्येक जण आठवड्यातून किमान एकदा तरी सूर्योदयाचा आनंद लुटण्यात अपयशी ठरतात, याचे मला आश्‍चर्य वाटते. सूर्योदय खरोखरच ताजेपणाचा खूपच विलक्षण अनुभव देतो.

दिवसाची सुंदर सुरवात करतो. काही जण तो दररोज पाहत असतील. मी अशा काही निवडक व्यक्तींपैकी होतो. आताही मी आठवड्यातून एक-दोनदा सकाळचा फेरफटका मारत उगवत्या सूर्याला ‘सुप्रभात’ म्हणतो. तुम्ही कधी जागे होताय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT