Education 
सप्तरंग

ऑन एअर : बोर्डातले 'मध्य-मार्की'!

आर. जे. संग्राम

बोर्डाचे निकाल लागल्यावर दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांची खूप चर्चा होते. पहिले, बोर्ड फाडून ९८, ९९ टक्के मार्क मिळवलेले टॉपर्स. यांचा सत्कार होतो, वेगवेगळे ट्युशनवाले त्याच मुलांचा फोटो आपल्या जाहिरातीत वापरतात आणि पुढच्या वर्षीची सीटे भरून घेतात. या मुलांचे पालक आणि शाळाही श्रेयात आपला वाटा घेतात. काही नातेवाईकही आपला खारीचा, सिंहाचा, हत्तीचा वगैरे वाटा असल्याचं सांगतात. दुसरे, नापास झालेले किंवा काठावर पास झालेले. आजकाल मीडियामधून, अभ्यासात ‘ढ’-वान, पण नंतर धनवान झालेल्या लोकांचं उदाहरण दिलं जातं. अशा मुलांचं आणि पालकांचं सांत्वन केलं जातं, त्यांना धीर दिला जातो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरंतर ३५-४० टक्क्यांखालच्यांचं सांत्वन बरोबरच आहे, केलचं पाहिजे. मात्र, बाकीच्या साधारण ५० ते ८० टक्केवाल्यांबद्दल फार चर्चा होत नाही. टोकाच्या भूमिका घ्यायला आपल्याला आवडतं. भक्त किंवा विभक्त अशा दोनच राजकीय भूमिका, त्यालाच जोडलेल्या दोनच धार्मिक भूमिका, स्वदेशी किंवा विदेशी अशा दोनच आर्थिक भूमिका वगैरे. आपण हजारो वर्षांपूर्वी टोळीत राहायचो आणि त्यामुळं समोरची व्यक्ती आपली की दुसऱ्या टोळीची, समोर आलेला प्राणी आपल्याला खाता येईल का तोच आपल्याला खाईल हे चटकन ओळखणाऱ्या व्यक्ती जागल्या. म्हणूनच आपल्यातही हा प्राचीन गुण आहे, हा उत्क्रांतीचा नियम आहे. मात्र, एखादी वृत्ती प्राचीन आहे, म्हणजे ती योग्य असं अजिबात नाही. उलट प्राचीन विरूद्ध मॉर्डन अशा याद्या बनवल्यास प्राचीनच्या सदरात काय लिहायचं, हा प्रश्‍न पडंल. करून बघा, वाटल्यास त्या याद्या मला फेसबुकवर पाठवा.

‘ब्लॅक अँड व्हाइट’ऐवजी मधला ग्रे, राखाडी रंग मला आवडतो. आणि बोर्डची परीक्षा देणाऱ्या १२ ते १५ लाख विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के मधले, ५० ते ८०-८५ मार्क मिळवणारे असतील. कोण आहेत ही मंडळी? एरवी काम करताना आपल्या सहकाऱ्यांचे दहावी-बारावीचे मार्क आपल्याला माहित नसतात. पहिल्या नोकरीनंतर तो विषयच निघत नाही. म्हणून मी काल ‘बिग एफएम’मधील वेगवेगळ्या पदांवर असलेल्या माझ्या आवडत्या सहकाऱ्यांना त्यांचे मार्क विचारले. सगळी यशस्वी मंडळी ही या मधल्या गटातील निघाली! 

धन्य ते मध्य-मार्की!! यांच्यामुळं तर जग टिकून आहे. आयुष्यभर अवास्तव अपेक्षांचं ओझं असलेले टॉपर आणि एकदा गटांगळी खाल्ली म्हणून पाण्याची सतत वाटणारी भीती, हे दोन्ही नसल्यामुळं ही मंडळी बिनधास्त काम करताना दिसतात, लगेच खचून जात नाहीत. यांच्या कामाला संथ, पण सतत अशी लय असते. विचार करा, तुमच्या ऑफिसमध्ये सगळेच टॉपर असते, तर रोजची कामं झाली असती का? तुमच्या आसपासच्या सगळ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सांत्वन, अभिनंदन करा, पण  मध्य-मार्की असतील, तर त्यांचं तोंड भरून कौतुक नक्की करा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT