Heart-Sickness
Heart-Sickness 
सप्तरंग

हृदयविकाराचे निदान कसे करतात?

सकाळ वृत्तसेवा

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ 
हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात. आपण काही महत्त्वाच्या तपासण्या पाहू.

१) इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) - ही अत्यंत साधी आणि सगळीकडे उपलब्ध असलेली तपासणी आहे. या तपासणीमध्ये हृदयाच्या इलेक्ट्रिकल जाळ्याविषयी माहिती मिळते. छातीत दुखत असेल अथवा छातीमध्ये जळजळ होत असेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरेने जवळील डॉक्टरांकडे जाऊन ही तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही आणि हृदयाला रक्तपुरवठा होत आहे का, हे कळते. पहिला ईसीजी नॉर्मल आला असल्यास १५ मिनिटांनंतर दुसरा ईसीजी काढून घ्यावा. या व्यतिरिक्त डॉक्टर आपल्याला ‘कार्डियाक एन्झाइम्स’ ही रक्ततपासणी करायलाही सांगू शकतात. 

२) कार्डियाक एन्झाइम्स - CPK MB ही तपासणी करून त्याची रक्तातील पातळी तपासतात. हृदयविकाराच्या झटक्याच्या पाच तासांच्या आत ही तपासणी केल्यास पातळी वाढलेली आढळते. ईसीजी नॉर्मल असल्यावरही ही तपासणी निदान करू शकते. याशिवाय ‘ट्रोपोनिन आय’ ही तपासणीदेखील हृदयविकाराचे निदान करू शकते. त्रास झाल्यानंतर अडीच आठवड्यांपर्यंत या चाचणीतून हृदयविकाराचे निदान होऊ शकते. 

हृदयविकाराच्या इतर काही महत्त्वाच्या चाचण्यांची माहिती आपण पुढील भागात घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT