Anger 
सप्तरंग

रागातून मुक्त व्हा!

सद्‌गुरू

राग येणे हे कोणत्या व्यक्तीबद्दल नसते. राग म्हणजे तुम्ही रागावलेले आहात. मग तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात, किंवा ईश्‍वर, गुरू किंवा आणखी कोणावरही असो, राग हा केवळ राग आहे. तुम्ही वगळता त्याचा इतर कोणाशी किंवा कशाशी काहीच संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो, याचे कारण म्हणजे तुमच्या रागाचे कारण दुसरे कोणीतरी आहे, असा तुमचा असलेला विश्‍वास. मात्र, तुम्ही हे जाणलेत, की रागाचा संबंध फक्त तुमच्या स्वतःशीच आहे, तर मग तुमचा राग फार काळ टिकणार नाही. कोणत्याही गोष्टीचा राग येण्याचे मूळ कारण म्हणजे तुमच्या तीव्र आवडीनिवडी होय. एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा भावनेशी खोलवर ओळख जोडल्याने राग येतो. तो जगण्याचा, विचार करण्याचा आणि भावना प्रकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी तुमची ठाम धारणा बनते. या अपेक्षांच्या चौकटीत बसत नसलेल्यांवर तुम्ही रागावता.

तुमच्या आवडीनिवडी, पसंती-नापसंती तीव्र होत जातात, तशा तुमच्या इतर गोष्टींबरोबर जोडल्या गेलेल्या ओळखीही अधिक गाढ होतात. तेव्हा हळूहळू अस्तित्वातील सर्वकाही तुम्ही वगळत असता. मी जर असे म्हणालो, मला हे खूपच आवडते, तर त्याचक्षणी बाकी सारे अस्तित्वच मी वगळतो. तुमची पसंती किंवा नापसंती तीव्र बनत जाते, तितके खोलवर तुम्ही अस्तित्वापासून विभक्त होत जाता. राग मर्यादा ओलांडतो, कारण तुम्ही कोणाला किंवा कशाला तरी तुमचाच एक भाग म्हणून सामावून घेतलेले नाही. राग हे कर्म नाही; पण सामावून न घेण्याची वृत्ती, हे कर्म आहे.

तुमच्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे दाखवण्यासाठी राग हा फक्त एक छोटासा संकेत आहे. मुक्तीची अवघी प्रक्रियाच मुळात सामावून घेण्यात आहे, वगळण्यात नाही. तुम्ही विभक्त असलात की तुम्ही एका सापळ्यात अडकता, वेगळे पडता. सामावून घेण्यातून तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी एकूण एक गोष्ट, संपूर्ण अस्तित्वच तुमच्यात सामावले जाते त्याचक्षणी तुम्ही मुक्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT