sadhguru
sadhguru 
सप्तरंग

अहंकाराप्रती नव्हे, जीवनाप्रती संवेदनशील व्हा! (सद्‌गुरू)

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

इनर इंजिनिअरिंग

जगात आज अहंकाराचा नायनाट करण्याबद्दल खूपच अनावश्‍यक चर्चा सुरू आहे. लोकांनी हे शास्त्रांमधून उचलले आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व असभ्य, अभद्र बनते, तेव्हा त्याला तुम्ही अहंकार म्हणता.

दोष दुसऱ्यावर ढकलायचा हा आणखी एक मार्ग आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व अभद्र होते, तेव्हा तुम्ही त्याकडे हा "मी' असंच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्याकडे "मी अभद्र, असभ्य झालो' असे पाहाल, तेव्हा तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावेसे वाटेल. जसे आहात तसेच असणे तुम्हाला आवडणार होणार नाही. पण हे टाळण्यासाठी आपण कित्येक युक्‍त्या लढवत असतो. या क्षणी तुम्ही सभ्य किंवा अभद्र असलात, तरी आहात ते तुम्हीच, हो की नाही? तसंच ध्यानात असू द्या. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या निर्माण करू नका, तुमचा अहंकार, तुमचा आत्मा, किंवा आणखी काही. ज्या क्षणी तुम्ही, जे छान आहे तो माझा आत्मा, आणि जे असभ्य आहे तो माझा अहंकार, यासारख्या गोष्टी निर्माण करता, तेव्हा परिवर्तन घडवून आणणे अशक्‍य होते. जेव्हा तुमच्या असे लक्षात येते, की मी जो कोणी आहे, सभ्य किंवा अभद्र, या दोन्ही माझ्यातच आहेत. तेव्हा, जे असभ्य आहे, ते बदलायला सुरवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही.

जगामध्ये आज आपल्याला एक साधी जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहे. जीवनाप्रती जागरूकता. लोकांमध्ये आज फक्त अहंकाराची जाणीव आहे, जीवनाची जाणीवच नाही. ते अहंकाराविषयी संवेदनशील आहेत, जीवनाविषयी संवेदनशील नाहीत. तुम्ही अहंकाराविषयी संवेदनशील असता, तेव्हा जीवन म्हणजे केवळ तुम्ही, इतर काहीही जीवन नाही, या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहत असता. तुमच्यात जीवनाविषयी जाण असेल, तर मात्र तुमच्या अनुभवात सर्व काही जीवन असते; त्यामुळे सहाजिकच, तुमच्या भोवती असलेल्या प्रत्येक जिवाशी तुम्ही समंजसपणे वर्तणूक करता. तुम्ही जर जीवनाविषयी संवेदनशील झालात, तर अहंकार ही समस्याच उरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT