Balak-Palak
Balak-Palak 
सप्तरंग

मायबोलीत शिकल्यामुळे...

शिवराज गोर्ले

बालक-पालक
    मातृभाषेवर जितकं प्रभुत्व, तितकी दुसरी कोणतीही भाषा शिकणं सोपं जातं.

    घरात ज्या भाषेत संवाद होतात, तीच भाषा, तेच वातावरण शाळेत मिळाल्यास मुलांना शाळा आपली वाटते, परकेपणा वाटत नाही. शाळा हे मजेचं ठिकाण आहे, अशी भावना होते.

    मातृभाषेत शिकल्यास खेळ, छंद अशा अनेक गोष्टींसाठी संधी व वेळ मिळतो, मुला-मुलींची सर्जनशीलता बहरते.

    कल्पनाशक्तीचा विकास लवकर व चांगला होऊ शकतो.

    मुलांची मानसिक व बौद्धिक जडणघडण उत्तम होते.

    मातृभाषेत शिकल्यानं मुलं आपापला अभ्यास करायला लवकर शिकतात.

    मातृभाषेतील शिक्षणामुळं विषयातील वेगवेगळ्या संकल्पना सहज समजतात.

    ज्ञान आत्मसात करण्यासाठी शोधक बुद्धी जागृत करण्यासाठी बहुजनांसाठी मातृभाषाच सशक्त माध्यम आहे.

    मातृभाषेतील समृद्ध साहित्याचा आस्वाद मुलं घेऊ शकतात. त्यायोगे चिंतनशील, प्रगल्भ होतात, अन्यथा या सांस्कृतिक ठेव्यापासून वंचित राहतात.

 मातृभाषेतून व्यक्तिगत विकास आणि भावनिक बदल सहज व परिणामकारकरीत्या घडून येतात.

 मनाची भाषा, विचार करण्याची भाषा व शिकण्याची भाषा एक असली पाहिजे. अर्थातच मातृभाषाच असली पाहिजे.

 आपल्या अवतीभवती बोलली जाणारी भाषा कुठलंही मूल नकळतपणे सहज शिकतं, त्यामुळंच शिक्षणही त्याच भाषेत दिलं गेल्यास ते अधिक जोमानं आणि सक्षमतेनं शिकतं.

    मातृभाषाच माध्यम असलेल्या शाळेत/शिक्षणप्रक्रियेत मुलं सहज वावरत असल्यानं आपली आपणही शिकत राहतात.

    प्रत्येक बालकाला आनंददायी बालपण, खेळायला मुभा आणि त्याच वेळी विचार करायची क्षमता विकसित होण्याला, मातृभाषेचं माध्यम असलेल्या शाळेतच वाव मिळतो.

    मातृभाषा माध्यम स्वीकारल्यामुळं आत्मसन्मानासह व्यक्ती जीवनाला एक भक्कम आकार मिळतो, आधार तयार होतो, तो व्यक्तीला सामाजिक जीवनाशी जोडत असतो.

    देशात झालेल्या दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे, की मातृभाषेतून शिकलेल्या व इंग्रजी एक विषय असलेल्या मुलाचं इंग्रजीसुद्धा इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगलं असतं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT