Child
Child 
सप्तरंग

मुलांची ‘समज’ कशी वाढवावी?

शिवराज गोर्ले

बालक-पालक
पाच, सहा वर्षांच्या मुलालाही खूप काही समजत असतं किंवा समजू शकत असतं, पण अनेकदा पालकच ‘हे त्याला काय समजणार’ असा समज करून घेतात. बालकांमध्ये ‘समज’ निर्माण व्हावी यासाठी पालक खूप काही करू शकतात. काय काय करू शकतात? याचं अतिशय सहजसोपं मार्गदर्शन डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘घरोघरी ज्ञानेश्‍वरी जन्मती’मध्ये केले आहे.

मुळात ‘समज’ म्हणजे काय, हे पालकांना समजलं पाहिजे. पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे, स्पर्शज्ञान होणे हे सगळे ‘समज’मध्ये अंतर्भूत असते. आई दिसत नसली तरी तिचा आवाज ओळखणं, स्पर्श न करताच आइस्क्रीम थंड असतं हे समजणं, चित्रातला प्राणी खरा वाटला तरी तो खरा नसतो आदी ही समज वाढवण्यासाठी काय करता येईल. या त्यांनी केलेल्या काही सूचना.

चार-पाच लाकडी ठोकळे घेऊन आपण त्यांची विशिष्ट कोन साधून मांडणी करावी. मुलाला हुबेहूब तशी करायला सांगावे.

वेगवेगळ्या आकारमानांचे, रंगाचे पदार्थ, वस्तू एकत्र कराव्यात व नंतर त्यातून सारख्या आकाराच्या वस्तू, सारख्या रंगाचे पत्ते, एकत्र करायला सांगावे.

शरीराच्या अवयवांना हात लावून तिकडे न पाहता ‘हे काय, सांग पाहू’ 
हा खेळ खेळावा.

खडूनं रेषा ओढून त्या रेषेवरून चालायला सांगावं.

तुम्ही वेगवेगळ्या वेगानं, पद्धतीनं धावावं, मुलाला तसंच धावून दाखवायला सांगावं.

भूमितीतील आकृत्या दाखवाव्यात. तसे आकार कुठं दिसतात, 
कशाचे असतात, हे विचारावं.

पंधरा-वीस वस्तू एकत्र मांडाव्यात. मुलाला नीट न्याहाळू द्यावे. मग त्याला डोळे मिटायला सांगून त्यातली एक वस्तू लपवावी. कुठली वस्तू कमी झालीय, तो ओळखतो का पाहावं.

घराजवळील दुकानापर्यंत किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणापर्यंत रस्त्याच्या कोणत्या बाजूला काय काय दिसतं, ते आठवलं का विचारावं.

दुःखी माणूस कसा चालतो, आनंदी माणूस कसा चालतो, गर्विष्ठ कसा चालतो, भित्रा कसा चालतो, शूर कसा चालतो तसं चालून दाखवण्यास सांगावं.

खूप काही करण्यासारखं आहे. पालकांकडं वेळ अन्‌ उत्साह हवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT