Edu 
सप्तरंग

मुलांची अभिव्यक्ती...

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक
व्यक्त होणं ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. मोठ्यांची तशी मुलांचीही. आपला स्व, आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं अंतरंग, आपल्या भावना, कल्पना, आपले विचार असं खूप काही आपण व्यक्त करत असतो. आधुनिक शिक्षणप्रक्रियेत स्वतःचे विचार, स्वतःची अभिव्यक्ती यांचं खूपच महत्त्व मानलं जातं. केतकी टिळक यांनी ‘शिक्षणवेध’मधून मुलांची अभिव्यक्तीविषयी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे हे काही पैलू... 

अभिव्यक्ती म्हणजे काय? अभिव्यक्त होणं म्हणजे काय? तर घेतलेल्या अनुभवांचा अर्थ पूर्व-अनुभवाशी ताडून त्यानुसार स्वतःचं मत, विचार व कल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं/शैलीनं मांडता येणं. मुलांना ही व्याख्या माहिती नसते; पण अभिव्यक्ती निश्‍चितच करता येते. अनेकदा अभिव्यक्तीचा संबंध कलेशी जोडला जातो; पण भाषा, गणित, विज्ञान... अशा विविध क्षेत्रांतही विचार, कल्पना, भावना सादरीकरणाची पद्धती यातही वेगवेगळी अभिव्यक्ती साधता येते. अभिव्यक्ती भाषिक, शारीरिक, गणिती, सांगीतिक, भावनिक, बौद्धिक... अनेक प्रकारे करता येते.

अडीच ते तीन वर्षांची मुलं जेव्हा अभिव्यक्त होताना दिसतात, तेव्हा मुक्तपणे त्याचा आनंद घेत असतात. कागदावर रंग ओढतात, संगीताच्या तालावर नाचतात, खेळण्यांशी संवाद साधतात, देवघरातल्या बाप्पाशी बोलतात, गोष्टी रचून सांगतात... या अभिव्यक्तीला जितका मुक्त वाव मिळेल, तितकी मुलं विविध अंगानं व्यक्त होऊ लागतात.

अभिव्यक्ती ही नेहमी वैयक्तिक असते. मुलं गाईडमधून किंवा कुणाला विचारून सुंदरसा निबंध लिहितात, ती अभिव्यक्ती नसते, नक्कल असते. मुलं चित्र काढताना दोन डोंगरांमधून उगवलेला सूर्य, उडणारे पक्षी, नारळाचं झाड काढतात ही अभिव्यक्ती नसून, जुन्यांची नक्कलच असते. स्वतःच्या अनुभवातलं निसर्गचित्र मुलांनी काढायला हवं... अभिव्यक्ती चूक किंवा बरोबर नसते. ते प्रामाणिक प्रकटीकरण असतं. पालक व शिक्षक यांनी मुलांना अभिव्यक्त होऊ द्यायचं असतं... अभिव्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करायचं असतं. हे एक छानसं, बोलकं उदाहरण. तिसरीच्या मुलांना वाऱ्याला प्रश्‍न विचारा असं सुचवलं गेलं. त्यांचे हे प्रश्‍न पाहा. तू कुठे राहतोस? तुला दिसतं का? पंख्याचा वारा तुझ्या ओळखीचा आहे का? तू श्‍वास घेतोस का? तू देवाला पाहिलंयस का? तू हलका असतोस, तरीसुद्धा मोठ्ठं झाड कसं पाडतोस?... 
ही खरी बालक अभिव्यक्ती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT