Edu
Edu 
सप्तरंग

मुलांकडून अनुभवातून ज्ञाननिर्मिती

सकाळ वृत्तसेवा

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो, हे आपण पाहिलं. लहान मूलही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच, स्वतःच्या अनुभवांच्या आधारे करत असतं. त्याला जे आधी माहीत असतं, त्यावर ते नव्या माहितीचा साज चढवतं. एकाअर्थी विटांवर वीट ठेवत जातं. यातला महत्त्वाचा भाग हा की, पहिली वीट हे मूल (जन्मतः) स्वतःच घेऊन आलेलं असतं. 

मूल जन्मल्याबरोबर त्याला भूक लागते. ते रडायला लागते. आई पदराखाली घेते तेव्हा त्याच्या भुकेचा प्रश्‍न मिटतो. बाळाच्या दृष्टीनं ते ज्ञान असतं. भूक कशी मिटवावी याचं. मग पुढं चमच्यानं दूध मिळणं, गरम/गोड दूध मिळणं... या अनुभवातून त्याचं ज्ञान विस्तारतं जातं. स्पर्शातून, आवाजातून, रूपावरून त्याला आई कळलेली असते. मग जवळची माणसं कळतात. हे सर्व ज्ञान तो पंचेंद्रियांमार्फत मिळवीत असतो. प्रत्येक अनुभव, मेंदूत एक हालचाल घडवून आणतो. अगदी साध्या साध्या अनुभवांचेही त्याच्या व्यक्तिमत्त्वावर त्याच्या शिकण्यावर परिणाम होत असतात. 

प्रत्यक्षात मूल अक्षरशः नाना तऱ्हेचे अनुभव घेत असतं. आनंदाचे... दुःखाचे, रागवण्याचे, लाडाचे. नव्या वस्तू, नवी माणसं, नवे स्पर्श, नव्या चवी हे सगळे त्याच्या लेखी अनुभवच असतात. अनुभव मेंदूचं खाद्य असतं. हे सारे अनुभव मेंदू साठवीत असतो. मेंदूतल्या वेगवेगळ्या क्षेत्रात न्यूरॉन्सची जुळणी होत असते. प्रत्येक अनुभवाची विशिष्ट पद्धतीनं रचना होत असते. यातला महत्त्वाचा भाग हा की, जे त्याचे जन्मापासूनचे अनुभव असतात, जे ज्ञान त्यानं मिळवलेलं असतं त्यावरच पुढच्या ज्ञानाची रचना होणार असते. शालेय शिक्षणापूर्वीच त्याचा हा पाया महत्त्वाचा असतो. 

औपचारिक शिक्षणाच्या टप्प्यात प्रवेश करताना मूल या ज्ञानानं जेवढं समृद्ध असेल, तेवढं औपचारिक शिक्षणातले विकासाचे टप्पे आत्मसात करणं सोपं जाईल; म्हणून मूल सहा वर्षांचं होईपर्यंत ते ज्ञाननिर्मितीच्या नैसर्गिक परिसरात असलं पाहिजे. उपजत प्रेरणेनुसार ते ज्ञानी झालं पाहिजे. तात्पर्य ः मुलांच्या विकासात नैसर्गिकरीत्या अनुभवांद्वारे होणारी ज्ञानरचना सर्वाधिक महत्त्वाची. ही ज्ञाननिर्मिती असते. फक्त ज्ञानसंग्रह नव्हे! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT