Sri-Sri-Ravishankar 
सप्तरंग

ईर्षेतून मुक्त व्हा...

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग
प्रसिद्ध संत आणि कवी कबीर यांचा प्रसिद्ध दोहा आहे. ‘मी जगामध्ये वाईट मनुष्य शोधायला गेलो, पण मला कुणीच वाईट सापडले नाही,’ असा त्या दोह्याचा अर्थ. खरंतर सर्वच माणसे चांगली असतात. त्यांच्यामध्ये नकारात्मक प्रवृत्ती असतात, पण तो मूलभूत मानवी स्वभाव नाही. ही प्रवृत्ती मानवी स्वभावाच्या परिघावर असते. कोणीतरी नकारात्मकतेने तरी का वागते? कारण ती आतमधून दुखावलेली असते. आनंदी, समाधानी व्यक्ती कुणाचेही नुकसान करत नाही, अगदी प्राण्यांचेसुद्धा. आपण, तसेच आपण ईर्षा करत असलेली व्यक्तीही कधीतरी मृत्यू पावणार आहोत, याचे ज्ञान हेच ईर्षेवरील रामबाण औषध होय. दोघांच्या मृत्यूमध्ये वेळेचा थोडाफार फरक पडू शकतो, मात्र मृत्यू निश्‍चितच. स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करणे हेच कधीही चांगले असते. तुम्ही आपण दहा किंवा पाच वर्षांपूर्वी कसे होतो, भविष्यात कसे असू, याचा विचार करा. तुम्ही एक समजूतदार मनुष्य आहात, एवढी वस्तुस्थिती पुरेशी आहे.  

तुम्हाला इतरांबद्दल वाटणारी ईर्षा कशी कमी कराल?
१. भूतकाळात व्यक्तीने काहीतरी चांगले केलेले असते. त्यामुळे, आता त्यांना त्याची चांगली फळे मिळत आहेत, हे समजून घ्या.
२. स्वतःची गुणवत्ता वाढविण्यासाठीची ही प्रेरणा समजा.
३. ईर्षा करणाऱ्यांप्रती मालकत्वाची भावना बाळगा. त्यांच्याकडे तुमचाच भाग म्हणून पाहा.
४. ईर्षा करणाऱ्यांच्या तुलनेत तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगा.
५. तुमच्यापेक्षा कमी असलेल्यांचा विचार करा.

इतरांच्या इर्षेचा सामना कसा कराल?
१. अशा व्यक्तींची अतिशयोक्तिपूर्ण स्तुती करा.
२. तुमच्या दयाळू कृतींमधून त्यांच्यामध्ये मालकी हक्काची भावना निर्माण करा.
३. त्यांच्यामधील ईर्षेची भावना तात्पुरती आहे, हे समजून घ्या.
४. या व्यक्तींची ईर्षाच मुळात न ओळखणे हा सर्वोत्तम उपाय. तुम्ही या ईर्षेचा वास्तव म्हणून स्वीकार केल्यास त्यातून तुमचेच अज्ञान वाढेल.
५. भावना हा आकाशात पुढे सरकणाऱ्या ढगाप्रमाणे असतात, हे ओळखा. 
भगवद्‌गीतेमध्ये भगवान कृष्ण सर्व चांगल्या गुणांबद्दल बोलतात आणि तुमच्यामध्ये ते आधीपासूनच असल्याची जाणीवही करून देतात. एखाद्या अणुप्रमाणे हे आहे. अणूचा गाभा सकारात्मक आणि नकारात्मकता परिघावर असते. नकारात्मकता खोलवर रुजलेली नसते, तो गाभा नव्हे, हे समजून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT