All-is-Well 
सप्तरंग

स्वविकासाकडून आत्मविकासाकडे...

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही रागावता, कारण तुम्हाला परिपूर्णता हवी असते. तुमची परिपूर्णतेची इच्छा असते किंवा तुम्हाला विशिष्ट गोष्टी काही विशिष्ट प्रकारेच हव्या असतात. मात्र तुम्ही स्वतःमध्ये ‘समोर येईल त्याला तोंड देणे हेच आयुष्य आहे,’ अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित करता तेव्हा मेंदू अचानक शांत, शिथिल होतो. तुमच्या राग किंवा संतापाची तुम्हाला तर मदत होत नाहीच, शिवाय संबंधित कामही पूर्ण होत नाही. तुमच्यावर कोणी एखादी व्यक्ती रागावते, तेव्हा तुम्हीही तिच्यावर रागावू शकता किंवा त्यांच्याकडे शांतपणे पाहत ‘शांती’ असे म्हणू शकता. खरेतर, संतापाला शस्त्र म्हणून वापरण्यात काहीच चुकीचे नाही.

मात्र त्यामुळे तुमच्या स्वत:च्याच मनाची शांती ढळत असल्यास तुम्ही स्वत:चे रक्षण करण्यसाठी शहाणपणाचा वापर करायला हवा. आपण घरामध्ये डस्टबिन ठेवतोच. अगदी त्याचप्रमाणे आपण अपरिपूर्णतेला काही वाव द्यायला हवा. त्यामुळे निदान तुमचे मन तरी शांत राहील. स्वतःचेच मन अस्थिर करण्यात आणि ते तसेच ठेवण्यात तरी काय अर्थ आहे?

जगामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. आपला समाज १२ प्रकारच्या व्यक्तींनी बनलेला आहे. त्यापैकी चार चांगले, चार मध्यम तर उर्वरित चौघै हताश असतात. तुम्ही हताश किंवा निराश व्यक्तींशी वागताना आपले मन नेहमी शांत ठेवले पाहिजे. मध्यम गटातील व्यक्ती तुमच्यामधील कौशल्य बाहेर काढतात. चांगल्या व्यक्ती तुम्हाला नेहमीच मदत करतात. जगात अपरिपूर्ण व्यक्तीही असतात. ते तुम्हाला क्रोधीत करतात. तुम्हाला खंबीर करण्यासाठी आपण आहोत, हे त्यांना माहीत असते.

आपण त्यांचा आहे तसा स्वीकार करून पुढे सरकले पाहिजे. तुम्ही या वेळी समतेचा दृष्टिकोन ठेवायला हवा. ते नेमक्या कोणत्या अवस्थेतून कुठल्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतात, हे तुम्ही पाहायला हवे. त्यामुळे, तुम्ही जे करू शकता, ते करत राहा. एक मोठी शक्ती प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवते, याची जाणीवही हवीच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT