Sri-Sri-Ravishankar 
सप्तरंग

अर्थ शुद्ध आणि अशुद्धतेचा...

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही दुःखी असता तेव्हा काय घडते? तुम्ही तुमच्या आत्म्यापासून दूर गेलेले असता, यालाच अशौच म्हणतात. याचा अर्थ तुम्ही अशुद्ध झालेले आहात. भारतात कुणी मृत्यू पावते, तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईक दहा दिवस अशौच पाळतात कारण ते दुःखी असतात. ते अशुद्ध असतात कारण ते आत्म्यापासून दूर गेलेले असतात. दहा दिवस हे अनुभवल्यावर, गीता वाचनानंतर, ज्ञानाबरोबर राहिल्यामुळे आणि आत्म्याकडे परतल्यानंतर ते शौच होतात. या प्रसंगामुळे आलेली अशुद्धता शौचामुळे बाहेर फेकली जाते. हे आयुष्यात वारंवार घडते. तुम्ही अशौच होत असता आणि तुम्हाला पुन्हा शौच व्हायचे असते. तुम्ही स्वतःच्या अंतःकरणात खोलवर शिरा म्हणजे खरे शौच घडेल. शौचाचे फायदे म्हणजे बुद्धीचा स्पष्टपणा, आनंददायी मन, केंद्रित सजगता आणि संवेदनांवर नियंत्रण आणि म्हणून आत्म्याचे सत्यस्वरूप ओळखण्याची पात्रता असते. शौच म्हणजे तुमच्या स्वतःच्या संवेदनांच्या नित्य प्रवृत्तींमध्ये आस्था नसणे. तुम्हाला उमजलेले असते की, ‘हो बरोबर, ही जुनी अपरिचित प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत आहे. मला हिचा पुरेसा अनुभव आला आहे आणि तरीही शरीर पुन्हा तिला शरण जात आहे.’

स्वतःच्या शरीरात आणि संवेदनेत एका क्षणभरासाठी उदासीनता येणे आणि संवेदना, सहज कल्पना, एक प्रकारची अरुची - या सर्वांमुळे तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलत आहे. लोक एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांचे घनिष्ठ संबंध असतात आणि तरीही ते का भांडतात? कारण अशौच झाले आहे. तुमच्यामध्ये संवेदनेच्या प्रवृत्तीविषयी अरुची निर्माण झाली नाही तर? तर संवेदनांच्या विषयाबद्दल अरुची निर्माण होतेच आणि तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या विषयाला दोष देता. तुम्ही दुसऱ्यास ‘परका’ समजता तोपर्यंतच तुमचे आकर्षण किंवा तुमच्या उत्कट इच्छा टिकतात. तुम्ही दुसऱ्यास आपला समजता, तेव्हा आकर्षण संपते. म्हणूनच नवरा-बायको आपल्या सहचराकडे आकर्षित होत नाही, तर दुसऱ्याकडे होतात कारण त्यांचा सहचर त्यांचाच एक भाग झालेला असतो. प्रत्येक जण तुमच्याच आत्म्याचा एक अंश आहे, हे तुम्ही जाणता, तेव्हा तुम्ही साऱ्या जगाचा आसक्तीशिवाय आनंद घेता. अशौच झाल्यास शौचाकडे त्वरित परत या.

समजा तुम्ही सांसारिक प्रसंगात बुडाला असाल तर फक्त जाणीव होऊ द्या, ‘मी अशौच झालो आहे, म्हणूनच दुःख भोगत आहे.’- आणि शौचाकडे परत या. तुमचा अभ्यास, ध्यानधारणा, सुदर्शनक्रिया, सेवा आणि सत्संग तुम्हाला यात मदत करेल. दुःख वाटून घेतल्याने संपत नसते. मात्र आनंद वाटला नाही तर तो नक्कीच कमी होतो. आपल्या समस्या फक्त ईश्‍वराला सांगा. प्रत्येकापुढे मांडू नका. त्यामुळे समस्या वाढतात. आपली सुखे सर्वांना वाटून टाका.

प्रश्‍न - लोक आम्हाला आपली दुःखे सांगतात, त्यांना साह्य कसे करायचे?
गुरुदेव -
 त्यांचे ऐकून घ्या. पण लक्ष देऊ नका. कारण तुमचेही मन त्या घटनांमध्ये गुंतून गेल्यास ते दुःखी आहेतच, पण त्याचबरोबर तुम्हीही दुःखी व्हाल. त्यांच्याशी ज्ञानाच्या गोष्टी बोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT