World Oceans Day 2019
World Oceans Day 2019 
सप्तरंग

World Oceans Day : आज प्लॅस्टीक गिळतोय, लक्षात ठेवा उद्या तुमचा नंबर!

सकाळ डिजिटल टीम

आपल्यासाठी समुद्र म्हणजे काय? अथांग क्षितीजापलिकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे सौंदर्य पाहण्याची जागा, पृथ्वीवरील सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारा स्त्रोत, तसेच खाद्य पदार्थ आणि औषधे देणारा स्त्रोत. छे ओ! असलं काही नसतं बरं का. समुद्र म्हणजे काय? आमच्यासाठी तर सगळ्यात मोठा 'Garbage can'.

संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सुरु करण्यात आलेला वर्ल्ड ओशन्स डे म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात समुद्र किती मोठी भूमिका बजावतो याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा दिवस. पृथ्वीवरील 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. याशिवाय वातावरणातील दोन तृतीयांश ऑक्सिजन हा समुद्रातून बाहेर पडतो. म्हणूनच यांचे रक्षण करण्याचे याशिवाय वेगळे कोणते कारण खरचं आपल्याला हवे आहे का?  

#WorldOceansDay #SaveOurOceans
समुद्र वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः पाऊल उचललंय का? त्यासाठी काही पुढाकार घेतलाय का? सांगा कमेंटबॉक्समध्ये 

स्त्री-पुरुष समानता ही यंदाच्या वर्ल्ड ओशन्स डेची थिम आहे. जगभरातील मंत्रीमंडळांमध्ये केवळ 27 टक्के महिला कार्यरत आहेत तर समुद्रांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये महिलांचा आकडा केवळ 38 टक्के आहे. 

सध्याच्या जगात सुमद्रांसाठी सर्वांत धोकादायक काय असेल तर प्लॅस्टिकचा अतिवापर, प्रदूषण, रसायनांचे सांडपाणी, खनिजांचा उपसा, जहाजांमधून होणारी तेलगळती, अतिरिक्त मासेमारी. अशा सगळ्या कारणांमुळे समुद्रांचा गळा घोटला जात आहे. 

आपले समुद्र जपण्यासाठी आपण कसा हातभार लावू शकतो?

1. कमीत कमी कचरा करणे

हा सर्वांत सोपा आणि महत्वाचा पर्याय आहे. आपले समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कचरा कमी करण्यात हातभार लावू शकतो. तसेच मुद्र किनारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकतो.

2. प्लॅस्टिकचा वापर कमी करणे

आपण हे नेहमी सांगत आलो आहोत, पुन्हा  पुन्हा सांगूयात. प्लॅस्टिकचा वापर कमी किंवा बंद करा. 

3. मासे खाणं कमी करा

अतिरिक्त मासेमारीचा समुद्रातील जीवन चक्रावर विपरीत परिणाम होता. त्यामुळेच शक्य असल्यास सागरी पदार्थांचे सेवन कमी करावे. 

4. समुद्र सफाईसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देणे

जगभरात अनेक संस्था पूर्णवेळ समुद्र सफाईसाठी कार्यरत आहेत. अशा संस्थांना आपण पाठिंबा देऊ शकतो. 

Inspiring Quotes to Understand Role of the Ocean

1. You can either see yourself as a wave in the ocean or you can see yourself as the ocean”. -Oprah Winfre

2. Health to the ocean means health for us”. -Sylvia Earle

3. “Blue, green, grey, white, or black; smooth, ruffled, or mountainous; that ocean is not silent”. -H. P. Lovecraft 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT