सप्तरंग

#MokaleVha एक क्षण स्वतःला सांभाळण्याचा

प्रतिभा देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली वेगवेगळी स्वप्ने असतात. आईच्या कुशीत स्वप्ने रुजतात, निसर्गात रमताना ती सत्यात येणार याची खात्री होते. आयुष्य कसे सोपे आणि सुंदर वाटायला लागते. तारुण्य किंचितसं उद्धट असूनही कुतूहल आणि मोहक, मनगटात प्रहार करण्याची आणि पृथ्वीवर स्वर्ग आणण्याची शक्ती देते. आयुष्य पुढे सरकते आणि मग आस लागते ती एका प्रेमळ साथीदाराची, त्याचा किंवा तिचा हात धरून प्रणयाच्या मार्गावर चालण्याची... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक टप्पा सुंदर आहे. स्वप्नं सत्यात उतरतील हा विश्वास असतो, आणि अचानक एके दिवशी अंधार दाटतो. सर्व काही विस्कळीत होते. जगण्याची इच्छाच संपून जाते. नेमका हा एक क्षण असतो स्वत:ला सांभाळण्याचा! कारण यानंतर येणार असते एक ‘परी’. तिच्याबरोबर ती प्रकाश आणते आणि आश्वासन देते, की तू काहीही गमावलेले नाहीये, सर्व तुझ्यातच आहे. फक्त ते ओळखणे आवश्यक आहे. हा विश्वास जगायला बळ देतो, आशा पुन्हा पालवते आणि आता मात्र खात्री असते त्याच्या पूर्ततेची, कारण आता आपल्याला इंद्रधनुष्यातील रंग, फुलपाखरे, फुले यांचा खरा अर्थ समजला आहे.

कोण असते ही ‘परी’?
कोणीही, जी आशा गमावलेल्या लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणते. ती आपला प्रियजन, समुपदेशक किंवा एखादा मित्रसुद्धा असू शकते. फक्त आपण मनमोकळे बोलले पाहिजे त्यांच्याशी, जे मनात असेल ते... आपल्या मनातली तगमग त्यांना कळली पाहिजे. मनमोकळे बोलण्यानेच स्वत:ला आत्मविश्वास मिळेल. आपल्याला हवी तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपल्याकडे सामग्री असतेच. त्यासाठी आपण सामर्थ्यवान असतो. फक्त हवी असते ती एक जाणीव. काहीवेळा ही परी आपणही असू शकतो. सहसा काहीही अचानक घडत नसते. रात्रीच्या आधी संध्याकाळ असतेच, मळभही असते सोबतीला, फक्त जगायच्या धुंदीत जाणवत नाही. मनाच्या आरशात ज्या वेळी आपली प्रतिमा धूसर दिसेल, तेव्हाच ठरवायचे आता परीची गरज आहे. काहीवेळा आपल्यालाच आपले कळते, की आपण जे स्वप्न बघितले आहे, ती फँटसी (fantasy) आहे की वास्तव, स्वप्न आहेत की नुसत्याच भ्रामक कल्पना, आणि तसे असेल तर मग स्वप्न, ध्येय, किंवा कदाचित मार्गही बदलावा लागेल. ध्येय आपले, स्वप्नही आपले, मार्गही आपला, तर मग जे करायचे ते भानावर राहून. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Latest Marathi News Union Budget 2026 केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद

Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

SCROLL FOR NEXT