Dr-Sucheta-Kadam 
सप्तरंग

#mokalevha समस्यांवर बोलू काही

डॉ. सुचेता कदम

गेल्या दोन वर्षांपासून पत्नी मुलासह माहेरी राहते. माझ्या सासू-सासऱ्यांचा हस्तपेक्ष जास्त आहे. पत्नी व सासऱ्यांनी विविध केस लावल्या; पंरतु मी काही केले नसल्याने काही झाले नाही. या सगळ्याला मी वैतागलो आहे. घटस्फोटाचा विचार करीत आहे. 
- पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरे लग्न करणे गुन्हा ठरतो. त्यामुळे सर्वप्रथम पत्नीशी चर्चा करून तिला हे लग्न टिकवायचे आहे, की नाही हे समजावून घ्या. तुम्ही आजवर पती-पत्नी म्हणून एकत्र राहिला आहात, त्यामुळे समझोत्याने प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केल्यास दोघांचाही मार्ग सुकर होईल. मुलगा सज्ञान होईपर्यंत त्याची आर्थिक जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. परस्पर संमतीने घटस्फोटासाठी प्रयत्न केल्यास कायदेशीर अडचणी कमी होऊ शकतात. त्यामुळे वैवाहिक समुपदेशकाच्या मदतीने सामोपचाराने प्रश्‍न सोडविणे योग्य ठरेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हाला बाळ झाल्यापासून, पत्नी पूर्णवेळ बाळाचे करण्यातच रमते, त्यामुळे आमच्या नात्यावर परिणाम झाला आहे. नात्यातील तणाव कमी करण्यासाठी काय करावे?
- बाळाच्या संगोपनात वडिलांचा सक्रिय सहभाग असल्यास बरेचसे फायदे आहेत, हे तुम्ही ओळखले पाहिजे. त्यासाठी पत्नीला मदत केल्यास पत्नीचा ताण कमी होऊ शकतो. तसेच तुमच्या सहभागामुळे पिता व मूल यांच्यातील भावनिक जवळीक व मानसिक ओढ वाढेल. चांगले आई-बाप होणे, सोपे नसते, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. यातूनच आपलेही व्यक्तिमत्त्व विकसित होत जाते. तुमच्या या सहभागामुळे पत्नीसोबतचे तुमचे नाते समृद्ध होण्यास मदत होऊ शकते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT