Success sakal
सप्तरंग

कानमंत्र : यश मिळवण्यासाठी...

आपलं चांगलं करिअर असावं, छान पैसे मिळावेत, यश मिळावं, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं सगळ्यांनाच वाटतं; पण सगळ्यांनाच ते जमत नाही.

सकाळ वृत्तसेवा

आपलं चांगलं करिअर असावं, छान पैसे मिळावेत, यश मिळावं, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं सगळ्यांनाच वाटतं; पण सगळ्यांनाच ते जमत नाही. करिअरची योग्य निवड होण्यासाठी आणि निवडलेल्या करिअरमध्येही योग्य वाटचाल करण्यासाठी काही कानमंत्र आपण विचारात घेऊ.

‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडा

परीक्षेत निकाल चांगला लावायचा असेल, निवडलेल्या कलेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, किंवा नोकरीमध्येही चांगली कामगिरी करून दाखवायची असेल, तर ‘कंफर्ट झोन’ सोडणं हाच मंत्र लक्षात ठेवायला पाहिजे.

पुढाकार घ्या

जी मुलं कॉलेजमध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात, वर्गात प्रश्न विचारतात, काही करण्यासाठी उत्साह दाखवतात त्यांच्याकडे शिक्षकांचं लक्ष जातं. नोकरीमध्येही पुढाकार घेणारे कर्मचारीच पुढे जातात.

शिक्षणाची सवय सुटू देऊ नका

नोकरी मिळाली, किंवा त्यात सेट्ल झाल्यावर आपल्याला वाटतं, की बास झालं शिक्षण. मात्र, ही चुकीची गोष्ट. शिक्षणाची प्रक्रिया प्रत्येकानं सतत सुरू ठेवायला हवी. जग प्रवाही असतं. सतत नवनवे बदल होत असतात. जो शिक्षणासाठी उत्सुक आणि इच्छुक असतो, शिकत असतो, तोच नवीन बदलांशी जुळवून घेऊ शकतो. तुमचं वय कितीही असो, पद कोणतंही असो- शिक्षणाला कोणतीही सीमा नसते. त्यामुळे शिकत राहा.

टीका सकारात्मकपणे घ्या

आपण कोणीही परफेक्ट नसतो. आपल्याला अनेकदा टीकांना सामोरं जावं लागतं. या टीकांमुळे नाउमेद होऊ नका आणि टीका करणाऱ्या व्यक्तीविषयी रागसुद्धा मनात धरू नका. त्यामुळे नकारात्मकता वाढीला लागते. उलट ही टीका सकारात्मकपणे घ्या. त्यातून तुम्हाला स्वतःच्या चुका लक्षात येतील. त्या चुकांवर मात करा, म्हणजे आयुष्यात तुम्ही पुढे जाल.

सातत्य हवे

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असा, अभ्यास करत असा, कलेची साधना करत असा- त्यात सातत्य असणं फार आवश्यक. ज्याच्यात सातत्य असतं तोच टिकतो. तुम्ही ज्या क्षणी थांबाल, त्या क्षणी तुमचा विकासही थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT