Celebrity Sakal
सप्तरंग

कलाकारांचे रक्षाबंधन

बहीण अन् भावाचं नातं अतूट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. एकमेकांना पाठिंबा देऊन नेहमीच पाठीशी राहतो तो भाऊ.

- अरुण सुर्वे

बहीण अन् भावाचं नातं अतूट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. एकमेकांना पाठिंबा देऊन नेहमीच पाठीशी राहतो तो भाऊ. यानिमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी रक्षाबंधनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक - रक्षाबंधन म्हटलं की राखी आली आणि राखी म्हटलं की भाबड्या बहिणीचे प्रेम त्याच्यात असतं. भावाने बहिणीला दिलेले काही सारे प्रोमिसेस त्याच्यामध्ये असतात. एक नितळ निखळ नातं आम्हाला आयुष्यभर जपायचं आहे. मोठा भाऊ आहे जो पुण्यात स्थायिक आहे. जो माझ्यापेक्षा साडेसात वर्षांनी मोठा आहे. त्याचं नाव अमेय नाईक आहे. आमचं नातं खरंतर अबोल आहे, असं म्हणायला हरकत नाही; कारण आम्ही एकमेकांना जास्ती फोन करत नाही किंवा मेसेज करत नाही.

पण, हे जे नात आहे ते खरंच खूप जास्तीत इंमोर्टल (अतूट) आहे असं म्हणायला हरकत नाही. माझा मोठा भाऊ जसा माझ्यासोबत माझ्या आयुष्यात उभा राहिला किंवा असाच उभा राहील अशी माझी परमेश्वर चरणी इच्छा असेल.

अभिनेत्री दीपाली पानसरे - रक्षाबंधनाची माझ्यासाठी खूप गोड आठवण आहे. मी जेव्हा लहान होते, त्यावेळी प्रत्येक मंदिरामध्ये हात जोडून देवाला म्हणायचे, की देवा मला प्लीज भाऊ दे आणि मी सात वर्षांची असताना मला भाऊ झाला. तेव्हापासून आतापर्यंत मी देवाचे खूप आभार मानले आहेत. तसेच भावाला खूप गिफ्टही दिले. आता तो मोठा झाला आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे हक्काने गिफ्ट मागू शकते. या वेळी शूटिंगमध्ये मला घरी जाता आलं नाही. मात्र लवकरच मी त्याला भेटणार असून, त्याच्याकडून गिफ्टही घेणार आहे.

अभिनेत्री स्मिता शेवाळे - चित्रपट इंडस्ट्रीमधील विशाल निकम याला मी यंदा राखी बांधणार आहे. मी १५ वर्षांपासून या क्षेत्रात आहे; पण कुणाला भाऊ करावं असं वाटलं नाही. कारण इतके ऋणानुबंध कुणाशी झाले नव्हते. मात्र यंदाचं रक्षाबंधन माझ्यासाठी स्पेशल असणार आहे. विशालला काहीही मदत लागली किंवा आम्हाला काहीही अडचण आली तर आम्ही एकमेकांसाठी उभे असतो. पण राखी बांधावं हे मला यावर्षी वाटलं. तो मला कायम ताई हे करू का, ते करू का असं विचारत असतो अन् साथही देतो.

अभिनेता पुष्कर जोग - आयुष्यात नाती जपणं हे फार महत्त्वाचं असतं. बहीण-भावाचं नातं फारच गोड आणि खास असतं. मी लहानपणी पुण्यात राहायचो तेव्हा मला आठवतंय आम्ही संपूर्ण जोग फॅमिली भेटायचो. माझ्या बहिणी किमयाताई आणि प्रियांका आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करायचो. खूप स्वीट खायचो. गिफ्ट एकमेकांना देऊन खूप धमाल करायचो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांचा आदर करण्याचे वचन घेऊया.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड - मागील वर्षी खूप बिझी शेड्यूल होतं. त्यामुळे मी घरी येईल आणि भावाला सौरभला राखी बांधेन, असं वाटत नव्हतं; पण आमचं प्रेम आणि बॉंडिंग असल्यामुळे मी सेटवर रिक्वेस्ट केली अन् घरी आले आणि रक्षाबंधन साजरे केले. विशेष म्हणजे मी बांधलेली राखी अजूनही भावाच्या हातात आहे. पण तो दिवस माझ्या व भावाच्या कायमच स्मरणात राहणारा आहे. आज मी त्याला पुन्हा नवी राखी बांधणार आहे. आम्ही खूप मजा, मस्ती अन् प्रेमही करतो. एक खंबीर भाऊ म्हणून तो सतत माझ्या मागे उभा असतो. आमच्या कुटुंबीयांनी कधीच मुलगा-मुलगी म्हणून भेदभाव केला नाही.

मी हुजूरपागामध्ये सेमी इंग्लिशला, तर तो पुणे कॅम्पमध्ये रोझरीमध्ये इंग्लिश मीडियमला होता. त्यावेळी आमची मराठी व इंग्लिश अशी स्पर्धा चालू असते. मला खूप चांगला भाऊ दिला आहे. असेच भाऊ महाराष्ट्रातील, देशातील बहिणींना दिले आहेत. त्यातील अनेक जण सीमेवर राहून देशसेवा करत आहेत, तर पोलिसही जिवाचे रान करून आपले संरक्षण करतात. त्यांनाही मी भाऊच मानते. त्यांना लहान बहिणीकडून सॅल्यूट करते.

अभिनेता सौरभ चौघुले - ‘जीव माझा गुंतला' या मराठी मालिकेत मी मल्हारची भूमिका साकारत आहे. रक्षाबंधनची एक खास आठवण आहे.  शाळेत असताना प्रत्येकाला वाटते की, आपल्या हातात राखी असावी. मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या मानलेल्या बहिणी मला राखी बांधायच्या. एका रक्षाबंधनला  मी घरी आईला सांगितला की मला पण राखी बांधून शाळेत जायचंय आणि बाकीचे मुलं शाळेत नवनवीन प्रकारच्या  राख्या बहिणीकडून बांधून येतात. मला नाही करता येत तसं, अशी तक्रार मी आईजवळ केली. त्यानंतरच्या रक्षाबंधनपासून माझ्या आईने मला राखी बांधण्यास सुरुवात केली. मला या गोष्ट सांगताना आनंद ही वाटतो आणि अभिमान पण की माझी आई ओवाळणी करून मला राखी बांधायची. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत त्या गोष्टीचा आनंद असायचा. शिक्षकांना पण मी सांगायचो की ही राखी माझ्या आईने मला बांधली आहे. आणि मित्रांना पण अभिमानानं ही गोष्ट सांगायचो. यावेळी मला खरंच मनापासून आई ला थँक्यू म्हणवा वाटत आहे. आई, खूप खूप थँक्स कायम माझ्याजवळ आणि सोबत राहण्यासाठी. जेव्हा मला एकटेपणा वाटलं आणि अस वाटलं की कोणी बहीण असावी त्यावेळेला तू होती, आहेस आणि कायम राहणार आहेस.

अभिनेता शिव ठाकरे - आठवी-नववीपर्यंत बाबा मला पन्नास रुपये द्यायचे. ते पन्नास रुपये ताईला देण्यासाठी असायचे आणि त्यासोबत एक रुपया मानाचा असायचा. राखी बांधली, आरती ओवळली , सगळ्या गोष्टी झाल्या. आता वेळ आली ती पैसे देण्याची. ते पन्नास रुपये खिशात ठेवायचो आणि एक रुपये तिला द्यायची आणि पळून जायचो. असे नववीपर्यंत सुरू राहिलं. नंतर दहावीला  डान्स क्लास सुरू झाले होते. तर मी ताईसाठी एक सरप्राईज म्हणून ड्रेस घेतला आणि तो तिला दिला. ते बघून सर्वांनी डोळे मोठे करून बोलले की हाच तो मुलगा जो पैसे घेऊन पळला होता. तर त्याने आज ड्रेस आणला. त्या दिवशी माझे कौतुक झाले. आधीपासूनच मी असे सरप्राईज दिले असते तर मज्जा नसती आली. तारीफ झाली नसती. मग मोठे झालो पण अजूनपर्यंत ताईने मला काही हक्काने मागितला नाही. मी सरप्राईज देत गेलो, ताई मागत नाही. खूप गोष्टी ताईने पण दिल्या आहेत. रक्षाबंधन म्हणजे फक्त भाऊच रक्षा करतो, असं नाहीये. ताई माझ्या नेहमी पाठीशी उभी राहिली आहे. कोणताही शो असू द्या, ताई नेहमी सोबत होती. डान्स स्पर्धेच्या वेळी ताईने खूप कामे केली.

अभिनेत्री अक्षया नाईक - ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाची भूमिका साकारत आहे. रक्षाबंधनची आठवण सांगायची ठरली तर मला एक चुलत भाऊ आणि एक आत्येभाऊ आहे. मी दरवर्षी त्यांनाच राखी बांधते. पण, माझा एक मित्र आहे जो भावासारखा आहे. पण याच्या व्यतिरिक्त माझी मोठी बहीण जी आहे, ती कुठल्याही भावापेक्षा माझ्यासाठी कमी नाहीये. आणि मी असं म्हणेन की मी सुद्धा तशीच काहीशी आहे. त्यामुळे रक्षाबंधनची खास आठवण म्हणजे दरवर्षी न विसरता मी आणि माझी बहिण दोघी एकमेकींना राखी बांधतो. खूप छान वाटत. कारण, आता जग खूप पुढं चाललंय. मुलगा-मुलगी, बहिण-भाऊ यापेक्षाही जास्त तुम्ही माणूस म्हणून किंवा व्यक्ती म्हणून ओळखले जाण खूप महत्त्वाचं आहे. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कधीच आई-वडिलांनी केला नाही. जर आमचा कोणी मोठा किंवा लहान भाऊ असता तर आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतली असती, तसच आम्ही दोघी बहिणी करतो आणि रक्षाबंधन साजरा करतो.

अभिनेत्री रूपाली भोसले - ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झालंय. बरोबर एक वर्षापूर्वी माझी आणि आमचं प्रॉडक्शन सांभाळणाऱ्या संकेत बरेशी माझी भेट झाली. सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअप रुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्याने मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. माझ्या भावाचं नावही संकेत आहे आणि सेटवरही या संकेतने मला भावासारखाच जीव लावला आहे. दोघांच्या नावात जसं साम्य आहे, अगदी तसंच साम्य त्यांच्या स्वभावातही आहे. माझ्या खोड्या काढणं, थट्टा-मस्करी करण्यासोबतच तो माझी खूप काळजीही घेतो. सिल्वासाला जेव्हा आमचं शूट सुरु होतं, तेव्हा तो रोज फोन करून माझी आवर्जून चौकशी करायचा. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे मला जशी संजना ही नवी ओळख मिळाली, त्याचप्रमाणे या मालिकेने मला एक भाऊही दिलाय. हे नातं मी आयुष्यभर जपेल.

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर - सगळ्याच सणांच्या गोड आठवणी माझ्याकडे आहेत. कारण, माझ्या लहानपणी सगळेच आम्ही एकत्र येऊन सण साजरे करायचे. त्यात खूप गंमत असते. मला खूप भाऊ होते, सगळ्यांमध्ये मिळून मी एकटीच बहिण होती, लडकी होती. त्यामुळे मला खूप भेटवस्तू मिळत. खूप लाड व्हायचे. दुसरी गंमत म्हणजे मी सुद्धा सगळ्याकडून राखी बांधून घ्यायचे, कारण माझं म्हणणं असायचं तुम्ही माझे रक्षण कराल तर मी सुद्धा उद्या तुमचं रक्षण करेल. दरवर्षी आपण भेटत राहतो, आनंद साजरा करत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे आपली भावंडं आपल्या आई-वडिलांनी दिलेली सर्वात मोठी भेटवस्तू आहे आणि कायमस्वरूपी भेटवस्तू आहे. मी माझं आयुष्य माझ्या भावाशिवाय कल्पना करू शकत नाही. मला मोठा भाऊ आहे. मला कायमच त्याचा आधार वाटत राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT