ऋतुमानानुसार आपली त्वचा नितळ, उजळ, तरुण राहावी यासाठी काही खास टिप्स
- कांचन अधिकारी
सध्या ठिकठिकाणी हलका ते मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळचा उन्हाळाही खूप कडक होता. मैत्रिणींनो, आपली म्हणजे खास करून स्त्री वर्गाची त्वचा (Skin) खूप नाजूक असते. त्यावर या वातावरणातील फरकांचा खूप परिणाम घडत असतो. अशा वेळेला आपल्या त्वचेची काळजी घेणं हे खूप गरजेचं बनून राहतं. आजकाल अनेक जणी ऑफिसमध्ये जातात. स्त्री- मग ती घरकाम करणारी असो किंवा अगदी, ऑफिसमधील सीईओ असो- कामासाठी घर सोडून ऑफिसमधे वेळेत पोचावंच लागतं. अशा वेळेला ऋतुमानानुसार आपली त्वचा नितळ, उजळ, तरुण राहावी यासाठी काही खास टिप्स मी आज आपणाला देणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हात जेव्हा तुम्हाला जायचं असेल, तेव्हा न चुकता सन् ब्लॉक क्रिम वापरण अगत्याचं आहे. सन् ब्लॉक लावा व त्यावर हलकासा कॉंपॅक्ट लावा. कॉंपॅक्ट आपल्या त्वचेच्या रंगानुसार मिळतात. लिक्विड कॉंपॅक्ट कधीही उन्हाळ्यात वापरू नयेत. त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना तोंडावर पीटिका येऊ शकतात. तरुणपणी आपल्या शरीरातून म्हणजेच त्वचेच्या रंध्रातून तेलकट द्रव पसरत असतो- ज्यामुळे आपली त्वचा तरुण दिसते; पण वयानुसार वयानुसार हा द्रव कमी कमी होऊ लागतो. अशा वेळेला चांगल्या कंपनीचा मॉइश्चरायझर जरूर लावावा. रात्री झोपताना न चुकता cleaning Lotion ने चेहरा पुसून काढावा. मी कधीच चेहऱ्याला साबण वापरत नाही. फक्त रात्री झोपण्यापूर्वी cleaning Lotionने चेहरा साफ करते. (cleaning Lotion एका टिश्यूवर थोडंसं घ्यावं व चेहरा क्लीन्स करावा. मी माझ्या वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला लागले होते. तेव्हा रोजच्या रोज मेकअप लावून मला तोंडावर पीटिका यायच्या, तेव्हा मी पॅनस्टिकचा मेकअप सोडून पॅनकेकचा वापर करू लागले. कारण पॅनस्टिकच्या मेकअपमूळे माझ्या चेहऱ्यावरील रंध्रांत तो oily make-up जाण्याने मला जास्त पीटिका येत होत्या, तर पॅनकेक Care मेकअप ड्राय असल्यामुळे आपोआपच पीटिका येण्याचं प्रमाण कमी झालं.
तारुण्यपीटिका जास्त आल्यास घरगुती उपाय म्हणजे सहाणेवर एक छोटा चमचा दूध घेणं. साधारण ८-१० थेंब त्यात जायफळ उगाळणं. व तो लेप फक्त जिथं पीटिका असेल त्यावर (रात्री झोपण्याआधी) लावणं. तो लेप कोरडा झाल्यावर मगच झोपा. जायफळानं आतील सूक्ष्मजंतू मरतात. चेहऱ्यावर मुरूम व पुरकुळ्याचे डाग असतील, तर त्यावर उपाय दुधात चंदन उगाळणं- त्यात थोडी हळद घालणं व हा लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावणं. चेहरा कोरडा झाल्यावर धुवून टाकणं. चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात, पण या प्रक्रियेत सातत्य हवं व सबुरी ठेवावी. आज लावल्यावर उद्या परिणाम दिसेल असं नाही; पण तीन-चार महिन्यांनी आपली त्वचा उजळेलंच, शिवाय चेहऱ्यावरचे डागही नाहीसे होतील. सतत उन्हात काम करण्यानं तोंडावर वांगस्वरूप पिगमेंटेशन येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेला काय करायचं, हे आपण पुढच्या लेखात पाहू या. आत्ता वरील उपाय घरगुतीच आहेत. ते जरूर करा, फक्त श्रद्धा, सबुरी, सातत्य ठेवा व सुंदर दिसा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.