bjp mp tejasvi surya special interview for sakal mangesh kolapkar Photo Source : newindianexpress.com
bjp mp tejasvi surya special interview for sakal mangesh kolapkar Photo Source : newindianexpress.com 
सप्तरंग

तेजस्वी सुर्या म्हणतात, 'जेएनयू म्हणजे देशातील विद्यार्थ्यांचा आवाज नव्हे'

मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

"देशातील युवक अशांत आहेत, असे कसे म्हणू शकता ?', "जेएनयू'मध्ये विद्यार्थ्यांचा एक गट आंदोलन करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आखणी काही गट आंदोलन करीत आहेत. म्हणजे देशातील विद्यार्थी झालेत का ?', "बंगळूर, मुंबई, पुणे येथे विद्यार्थ्यांची संख्या किती आणि आंदोलन करणाऱ्यांची संख्या किती आहे, याबाबतचा जरा आढावा घ्या' असे सांगत तेजस्वी त्यांचे मुद्दे "कन्व्हिन्स' करीत होते. निमित्त होते स्वामी विवेकानंद जयंतीचे.... देशातील युवक अशांत झाला आहे, असे सध्या सांगण्याची "टूम' आली आहे म्हणूनच संवादाची सुरवात त्याच प्रश्नाुपासून केली. तर, फोटोतून शांत वाटणारे तेजस्वी एकदम उसळल्याचे त्यांच्या आवाजावरूनच समजले. आमचा संवाद फोनवरून होत असला तरी, त्यासाठी तीन दिवस प्रयत्न करावे लागले. कारण देशातील सर्वात युवा खासदार अन्‌ वक्ता म्हणूनही तेजस्वी प्रभावी असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना सतत बोलवणं येत. रोज त्यांना किमान 500 ते 600 फोन येतात, असे त्यांचे "पीए' भानू यांनी सांगितले. त्यामुळे तेजस्वी यांना फोनवर सहजासहजी गाठणं अवघडच. पण येनकेण प्रकारे त्यांना गाठल्यावर सलग 23 मिनिटांच्या कॉलमध्ये तेजस्वी हे "तेजस्वी' असल्याचा भास झाला. 

दिल्ली, बंगळूर, मुंबई, पुण्यात किती तरी लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. पण दिल्लीतील "जेएनयू' सोडले तर, विद्यार्थ्यांची आंदोलने कोठे झाली आहेत ? झालेल्या आंदोलनांमध्ये राजकीय हेतू असणारेच घटक जास्त आहेत, हे स्पष्टच दिसते. तेच घटक हे "देशातील युवक अस्वस्थ आहेत', असा "प्रपोगंडा' हेतूतः निर्माण करून पसरवित आहेत, असे तेजस्वी यांचे स्पष्ट मत आहे. त्याला फार काळ प्रतिसाद मिळणार नाही, कारण त्या विषयात काही तथ्यच नाही, कारण दगडफेक करणाऱ्यांची ओळख पोलिसांना आता पटली आहे. त्यामुळे कांगावा करणारेच आता हल्लेखोर होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक- दोन दिवसांत आणखी उलगडा होईल, असेही ते सांगतात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी माफक शुल्कात हव्या आहेत, शैक्षणिक संस्थांचा दर्जा चांगला हवा, त्यांच्यातील क्रिएटिव्हीटीला चालना देणारे शिक्षण त्यांना हवे आहे. चांगल्या शिक्षणानंतर नोकरीच्या संधीही त्यांना पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर मोठी स्वप्ने आहेत. त्याची वाटचाल करीत त्यांना त्यांचे जीवनमान उंचावयाचे आहे. याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी राजकीय विचार करू नये. तो त्यांनी जरूर करावा. पण संयम हवा. जाळपोळ, दगडफेक म्हणजे आंदोलने आहेत का ?अन्‌ मुख्य म्हणजे त्यांना "इंटरेस्ट' आहे त्यांनी ते राजकारण करावे अन ज्यांना त्यात "इंटरेस्ट' नाही, त्यांना बळजबरी करू नये.... कारण इंटरेस्ट नसलेल्याच युवकांची संख्या जास्त आहे, असे तेजस्वी प्रांजळपणे सांगत होते. मी स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे "प्रॉडक्ट्' आहे, असेही बोलण्याच्या ओघात त्यांनी स्पष्ट केले.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषय निघाला "जेएनयु'चा. त्या बाबत ते म्हणाले, ""दगडफेक किंवा व्यक्तिवर होणारा हल्ला हा जेएनयु असो अथवा अन्य कोठेही, केव्हाही तो वाईटच असतो, त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. मात्र, देशात कोठेही विद्यार्थ्यांवर असे हल्ले झालेले नाहीत. तसेच जेएनयुमधील घटनेबाबत अजूनही उलट-सुलट दावे होत आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच जाळपोळ केल्याचे फुटेज आता प्रसिद्ध झाले आहे. लढा विचारांशी असताना, विद्यापीठाचे नुकसान का करायचे ?'' मुळात जेएनयुमधील विद्यार्थ्यांचा आवाज म्हणजे देशातील विद्यार्थ्यांचा आवाज नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पण, आक्रस्ताळेपणा आणि आकांडतांडव केल्यामुळे खोटे मुद्दे हे खरे होत नाहीत, असेही तेजस्वी सांगतात. जच्या युवकांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या, त्यासाठीचा प्राधान्यक्रम, उपाययोजना या बाबतही तेजस्वी यांनी चर्चा केली. पण, कळकळीने एक मुद्दा त्यांनी आवर्जुन मांडला तो म्हणजे, सोशल मीडियाचा. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हृॉटसअप, ट्विटरवर जे "फॉरवर्ड' होते, त्यांची खातरजमा करा. माहिती खरी घ्या, म्हणजे गैरसमजुतीमधून काही विपरित घडणार नाही. सध्याच्या अशांततेबाबत "सोशल मीडिया' महत्त्वाचा घटक ठरत आहे, असेच त्यांना अप्रत्यक्षपणे म्हणायचे होते पण, जरा वळण त्यांनी लांबचे घेतले इतकेच.

National Youth Day युवा दिन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT