Blog on break up day 
सप्तरंग

Breakup Day: दोघांच्या प्रेमाची 'अधुरी एक कहाणी...'

प्राजक्ता निपसे

शुद्ध प्रेमाची ही अधुरी एक कहाणी आहे. अर्जुन सक्सेना, हा बिझनेस टायकून विजयपथ सक्सेना यांचा मुलगा तुरूंगात दाखल झाल्यापासून सुरू झाली. तो जामिनावर सुटण्यास किंवा कोणत्याही वकीलाशी बोलण्यास नकार देतो. एक तरुण वकील माया राय त्याची केस लढण्यासाठी आतुर आहे.पण अर्जुन तिलाच काय तर कोणत्याही वकिलाला दाद देत नाही. शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर अर्जुन आपली केस लढण्यास आणि कहाणी वकील माया हिला सांगण्यास तयार होतो.

अर्जुन याचे मसुरी या छोट्या गावातली एक सुंदर मुलगी, पलक वालिया हिच्याशी तिचे प्रेम होते. पण ते प्रेम अर्धवटच राहते कारण त्यांच्या आयुष्यात खूप काही अडचणी येतात.पलक वालिया हिला गाणे गाण्याची फार आवड असते. तिचे वडील एक सामाजिक संस्था चालवतात आणि तिच्या दोन लहान बहिणी शनाया आणि कियारा यांच्या सोबत ती राहत असते.  पलकचे वडील हरीप्रसाद वालिया निवृत्त झाल्यानंतर, पलक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अर्जुनची सहकारी म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्यास तयार होते. पण गर्विष्ठ, गर्भ श्रीमंत आणि विभक्त जोडप्याचा मुलगा अर्जुन तिच्याशी चांगला वागत नाही, काही कारणामुळे  तो आपल्या आईचा तिरस्कार करतो आणि म्हणून त्याला सर्व स्त्रियाबद्दल घृणा असते.

पलक सतत त्याच्या मदतीला सोबत उभी राहते, ती अर्जुनला बदलण्याचा प्रयत्न  करते, कारण तो चांगला मुलगा असतो. पण नेहमी प्रेमापासून दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. म्हणून मुलींपासून कोसो दूर राहत. परंतु सहवासामुळे त्याला पलक आवडायला लागते. तो स्त्रीयांवर विश्स्वास ठेवायला लागतो. दोघांमध्ये हळूहळू एकमेकांबद्दल कोमल भावना निर्माण होतात. या दरम्यान अर्जुनाला समजते की पलकची संगीत गुरू खरंतर अर्जुनची आई रीना आहे, जी कि त्याला लहानपणीच त्याच्या वडिलांना आणि त्याला सोडून गेलेली असते.

अर्जुन पलकला त्याच्या आई सोबत पाहतो आणि त्याचा विश्वासघात झाला असा गैरसमज करून घेतो.  या घटनेचा वाईट परिणाम त्यांच्या उमलत जाणाऱ्या नात्यांवर होऊ लागतो. ते ऑफिसामध्ये एकमेकांशी वाईट वागायला लागतात. एका पार्टीला गेल्यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण होते. भांडण झाल्यामुळे पार्टीतून निघून जात असताना त्यांचा अपघात होतो.  तो अपघात अर्जुनने केला असा पलकचा गैरसमज होतो म्हणून ती मसुरी सोडून दिल्लीला  जाते. 

पलक दिल्लीला गेल्यानंतर अमण या एका संगीत दिग्दर्शकाला भेटते.  अमनला भेटल्यानंतर पलकला त्याच्याबरोबर कॉन्सर्टमध्ये काम करण्याची संधी मिळते. अमन पलकच्या कुटुंबात रुळल्यानंतर पलकचे  कुटुंबीय अमणशी तिच्या लग्नाची बोलणी करतात. पण ती या गोष्टीमुळे खुश नसते कारण अजूनही अर्जुनवर ती प्रेम करत असते. अशातच दिल्लीत एका कामासाठी आलेले अर्जुनचे वडील विजयपथ सक्सेना पलकला भेटतात. या भेटीत ते पलकला अर्जुनच्या आईविषयी सांगतात कि रीना हि श्रीमंत कुटुंबातील एक "लोभी" स्त्री असते. तिच्या पासून अर्जुनला दूर ठेवण्यासाठी त्यांनी अर्जुनला दत्तक घेतले आहे .

पलकने अर्जुनच्या भविष्यासाठी, म्हणून तिने अर्जुनला सोडून जावे हि विनंती करतो. या रहस्याने अर्जुनचे वडील तिला ब्लॅकमेल करतात. या सगळ्या प्रकाराला वैतागून पलक अमणचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारते. हे जेव्हा अर्जुनला हे कळले तेव्हा तो रागाच्या भरात तिच्या लग्नाच्या ठिकाणाहून तिला पळवून लांब घेऊन जातो. पलकला अर्जुनच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिचा परिवार जंग जंग पछाडतात. शेवटी कसे तरी ते त्या दोघांना शोधण्यात यशस्वी होतात. अर्जुन आणि पलकचे वडील हरिप्रसाद वालिया यांच्यात जोरदार हाणामारी होते. या हाणामारीमध्ये पलकचे वडील गच्चीवरुन खाली पडतात. खाली पडल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. अर्जुन ने हरीप्रसाद वालिया यांचा खून केला असं समजून अर्जुनला अटक होते. 

अशाप्रकारे अर्जुन पलक ची कहाणी इथेच थांबते. पण आता अर्जुन पलक एक होऊ शकत नाही कारण त्याला फाशी होणार आहे. अर्जुनने स्वतःची हि करुण कहाणी संपवल्यानंतर माया राय फाशी रोखण्यासाठी त्याला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न चालूच ठेवते. माया राय पलकला शोधून काढते. जी दिल्लीची एक लोकप्रिय गायिका झालेली असते. पलकने अर्जुनची फाशी रोखावी अशी ती विनंती करते,पण पलक अर्जुनला तिच्या वडीलांच्या हत्येबद्दल माफ करणार नाही असं सांगते व मदत करण्यास नकार देते. अशी हि बिचाऱ्या निरपराध अर्जुन आणि पलकची हि अनोखी अर्धवट कहाणी. एक पल के लिये सादिया छोडी एक दिल के लिए दुनिया  असं म्हणत अर्जुन फासावर चढतो. ना हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगीमे असं म्हणतात ते खरंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : दारूच्या नशेत एसटी चालवली! पंढरपूरवरून परतणाऱ्या चालक-वाहकाची चौकशी होणार

Nashik Crime : पोलिस असल्याचे सांगून’ ७० वर्षीय वृद्धेच्या दागिन्यांवर डल्ला

Weekly Numerology Prediction : कुणाला अचानक धनलाभ तर कुणाला मिळणार यश, कसा जाईल 14 ते 20 जुलैचा आठवडा; जाणून घ्या भविष्य

1961 Panshet Dam Break: अंगावर काटा आणणाऱ्या आठवणी, प्रत्येक पुणेकराने ऐका । Pune News

Wildlife: पैनगंगाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग; भारतीय वन्यजीव संस्थेनेही केली होती केंद्राला शिफारस

SCROLL FOR NEXT