British Nandi writes about the new government maharashtra politics cm eknath shinde dcm devendra fadanvis cabinet  sakal
सप्तरंग

ढिंग टांग : नवं सरकार !

ब्रिटिश नंदी

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

जनतेच्या भल्यासाठी सारं

बैजवार झालंय!

आता सम्दं भलं व्हनार

आता सम्दं खुलं व्हनार

आता सम्द ढिलं व्हनार

इडा टळली, पीडा टळली,

मंगल मंगल झालंय,

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

काय सुरत, काय आसाम,

काय गोवा, काय प्रवास

तत्त्वांसाठी पायपीट होती

लई सहन केला त्रास!

जुलुमशाही गेली लांब

उभा लोकशाहीचा खांब

भिऊ नकोस, जरा थांब!

लोकशाहीसाठीच एवढं सगळं

दादा, करावंच लागतंय,

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

लोकहो, पुढाऱ्याचं जिणं

खडतर असतं फार

लोकांसाठीच त्यांना लागतं

हाटेल फाइव स्टार!

फिरायला खास विमान

मर्सिडिझ गाड्यांची शान

पंचतारांकित लोककल्याण!

उठता बसता गांधींचं नाव

यांच्या मुखी असतंय!

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

एक नेता उठला, आणि

खुर्चीसकट पळाला!

दुसरा नेता उठला, आणि

घरी जाऊन बसला!

कोण आला कुठे?

कोण आडमुठे?

कोण उंच थिटे?

थोडं लोककल्याण, थोडा टाइमपास

असंच गणित असतंय!

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

लोकशाही म्हंजे तुम्हास्नी

पोरखेळ वाटला काय?

खुर्चीसकट पळाले नेते

ही काय जोक नाय!

खरं असतं संख्याबळ

खरं असतं मतांचं बळ

खरं असतं अश्रूंचं बळ

कुणाचं खरं, कुणाचं लबाड

सोयीनं ठरत असतंय!

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

तुमचं नाही, आमचं नाही,

सारं जन्तेसाठी

स्वार्थासाठी काही नाही,

सारं लोकांसाठी!

तुमचं आमचं कल्याण व्हणार,

हे तर नक्की झालंय!

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

नव्या सरकारचं आता लोकहो,

जोरात स्वागत करा!

फोडा फटाकं, भुईनळ्या

अन वाजवा ढोल नगारा

कोपरापासून जोडा हात

होऊंजाऊ द्या रुजवात

मगच बनेल पक्की बात

कुणाचं काईबी चालू द्या, राव,

आपण तर जन्ता असतोय!

नवं सरकार आलंय, लोकहो,

नवं सरकार आलंय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT