British Nandi writes rajya sabha election result devendra fadanvis uddhav thackeray sakal
सप्तरंग

ढिंग टांग : गणिताचा पेपर!

ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) जय महाराष्ट्र…बरं का!

दादू : (उदासपणाने) आपण ज्यांच्याशी संपर्क करु इच्छिता, ते आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत…कृपया थोड्या वेळाने डायल करा!...टुंग ट्रिंक…खर्रर्र…भुर्रक…भ्यँ…ढप्प!

सदू : (आनंद लपवत) तुझा आवाज ओळखतो मी दादू! तुझं हे सदोदित संपर्कक्षेत्राच्या बाहेर राहाणंच नडलंय, हे आता लक्षात आलंय का तुझ्या? कशाला जावं एखाद्यानं उंटाचा मुका घ्यायला?

दादू : (डोळे गरागरा फिरवत) खामोश! सद्या…हरलो असलो तरी वाघ आहे मी, हे विसरु नकोस!! वाघाच्या एका यशस्वी शिकारीमागे दहा अपयशी हल्ले असतात, असं जंगलशास्त्रात म्हटलं आहे!!

सदू : (नरमाईनं घेत) …बरं ऱ्हायलं! आता शिकारबिकार सोड, तू दूध पी तूर्त हळद घालून!

दादू : (दुर्लक्ष करत) किती स्वप्नं पाहिली होती मी…आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, आणि विजयाचा गुलाल उधळत, ढोलताशांच्या गजरात आम्ही जल्लोष करु!! पण कसचं काय…

सदू : (नेमस्तपणाने) माणसानं कसं सुशेगाद राजकारण करावं! ज्यमलं तर ज्यमलं, नै त नै!! सगळे सांगत होते की तिसरा उमेदवार उभा करु नका म्हणून…ऐकलं नाहीस!!

दादू : (हट्टानं) का म्हणून ऐकू? आमच्याकडे एकजूट होती, आकडे होते! सत्ता होती, ताकद होती…काय नव्हतं आमच्याकडे? (ऐतिहासिक विषण्ण आवाज लावत) पण…पण… ही फंदफितुरीऽऽऽ….महाराष्ट्राला लागलेली ही कीडच आहे, सदूराया! ही वेळीच छाटली नाही तर दौलतीची विधुळवाट लागेल!!

सदू : (समजूत घालत) उगी उगी! असं काही होणार नाही बरं! उगाच जिवाला त्रास करुन घेऊ नको! अरे, एक निवडणूक हरली म्हणून सर्वस्व थोडीच गेलं? आणखी किती तरी निवडणुका लागोपाठ येतायत…

दादू : (हादरुन) डोण्ट टेल मी!!

सदू : (बोटं मोडत) आता परिषदेच्या निवडणुका आल्याच…पाठोपाठ महापालिकांच्या येतायत! मग पुन्हा सार्वत्रिक निवडणुकांचा गोंधळ सुरु होईल! तेव्हा वचपा काढ, म्हंजे झालं!! आहे काय नि नाही काय!!

दादू : (गोंधळून ) ख…खरंच सांगतोयस की ध...धमकी देतोयस?

सदू : (सलगीनं) धमकी कशाला देईन, दादूराया? कसाही असलास, आणि हरला असलास तरी माझा भाऊ आहेस ना?

दादू : (स्वत:ला सावरत) अजूनही निवडणूक कशी हरलो याची टोटल लागत नाहीए! नेमकं काय नडलं असेल?

सदू : (विश्लेषण करत) सांगितलं ना, कायम संपर्कक्षेत्राच्या बाहेर राहण्याचा स्वभाव नडला! बाकीच्यांनी तेवढ्यात आपली कनेक्शनं जुळवून घेतलीन!! ज्यांना मित्र मानलंत त्यांनी केसानं गळा कापलान!

दादू : (गदगदून) जिवाभावाचा प्रामाणिक, एकनिष्ठ मित्र मला का नाही रे लाभत? सगळेच कसे मेले चोर?

सदू : (मानभावीपणानं ) बॅडलक…दुसरं काय?

दादू : (डोळे पुसत) तुझ्याकडे मन मोकळं केलं की बरं वाटतं! सदूराया,काल रात्री मला भयंकर स्वप्न पडलं!

सदू : (थंडपणाने) कसलं स्वप्न?

दादू : (शहारुन) स्वप्नात मी चित्रकलेच्या शेवटच्या पेपरसाठी रंगबिंग कालवतो आहे, ब्रश काढतो आहे… आणि पुढ्यात एकदम गणिताचा पेपर आला!!

सदू : (हसू आवरत) मग?

दादू : (चिडून) मग काय?...मी ओरडत झोपेतून उठलो ना!!

सदू : (पोक्तपणाने) ऐक, ते स्वप्न नव्हतं, खरंच तसं घडलं! आणखी एक सांगतो- ताबडतोब गणिताची शिकवणी लाव! तुझं गणित भयंकर कच्वं आहे! जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT