aditi and vikram
aditi and vikram 
सप्तरंग

पहिल्याच भेटीत झाली मैत्री!

सकाळ वृत्तसेवा

जोडी पडद्यावरची - अदिती शर्मा आणि विक्रमसिंह चौहान
अभिनेता विक्रमसिंह चौहान ‘एक दिवाना था’, ‘जाना ना दूर दिलसे’, ‘कूबूल है’सारख्या हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला, तर अभिनेत्री अदिती शर्माने ‘कलिरें’ मालिकेत साकारलेली भूमिका खूपच गाजली. आता हे दोघेही स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये जादू जिन्न का’ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. प्रथम एकमेकांना न ओळखणाऱ्या अदिती-विक्रममध्ये आता चांगली मैत्री झाली आहे. दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले असता अदिती सांगते, ‘‘आम्ही पहिल्यांदाच या मालिकेच्या मॉक शूटसाठी भेटलो होतो. या मालिकेसाठी बऱ्याच मुलांचे मॉक शूट झाले होते. त्यानंतर विक्रम भेटला आणि त्याची या मालिकेसाठी निवड करण्यात आली. मॉक शूट करताना आम्हाला एक शायरी करायची होती आणि त्यावेळी आम्हाला दोघांनाही शायरी येत नसल्याने आम्ही दोघेही खूप मस्ती करत होतो, हसत होतो. असे करत-करत आमची मैत्री कधी झाली हे कळलेच नाही. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हाच आमची मैत्री झाली.’’ 

याबाबत विक्रम सांगतो, ‘‘आम्ही मालिकेच्या मॉक शूटसाठी भेटलो होतो. त्यावेळी अदिती माझ्याशी पहिल्यांदा बोलायला आली. पहिल्याच दिवशी ती खूपच बडबड करत होती. आम्ही याआधी कुठेकुठे काम केले आहे, याबाबत बोलत होतो. बोलता-बोलता आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्यासारखे बोलायला लागलो, तेव्हाच आमची चांगली मैत्री झाली.’’

एकमेकांबरोबर पहिल्यांदाच काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता विक्रम सांगतो, ‘‘अदिती दिल्लीची आहे आणि मी डेहराडूनचा आहे. दिल्ली-डेहराडूनमध्ये जास्त अंतर नाही. त्यामुळे चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच अदितीशी बोलताना मला आम्ही पहिल्यांदाच एकत्र असल्याचे अजिबातच जाणवले नाही. अदिती खूपच हुशार, बडबडी आहे.

तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. तिला बोलण्याची जास्त सवय असल्याने कधीकधी तिच्यासोबत काम करताना मला थोडे दडपण येते. चित्रपटसृष्टीत मी तिच्यापेक्षा जास्त काम केले असले, तरीही ती माझ्यापेक्षा खूपच कॉन्फिडेन्ट आणि हुशार आहे. त्यामुळे मी तिच्यासोबत काम करताना मी माझा कॉन्फिडन्ट थोडा जुळवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.’’ याबाबत अदिती विक्रमबद्दल सांगते, ‘‘विक्रमसोबत पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे. तो खूपच चांगला अभिनेता आणि सहकलाकार आहे. अभिनयाबाबत सेटवर तो मला खूप मदत करतो. तो माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्टदेखील करतो. मला कामाबाबत नेहमीच प्रवृत्त करत असतो. मी कुठे चुकल्यास मला समजून देखील घेतो.’’

मैत्री वाढत जाते तसा एकमेकांचा स्वभावदेखील कळतो. एक अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून दोघेही कसे आहेत हे विचारले असता अदिती सांगते, ‘‘विक्रम एक अभिनेता म्हणून मला खूपच मदत करत असतो. आम्ही या मालिकेच्या निमित्ताने जास्त काम केले नाही; पण कमी वेळात आम्ही खूपच चांगले मित्र झालो आहोत. कोणत्याही सीनविषयी मला काही समस्या असल्यास सहकलाकार म्हणून तो मला सगळ्या गोष्टी समजावतो. आम्ही दोघे मिळून त्या गोष्टींवर चर्चा करतो. एक व्यक्ती म्हणून सेटवर तो खूपच नम्र असतो. सगळ्यांशी खूपच चांगला वागतो.’’
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT