Ankita-Lokhande
Ankita-Lokhande 
सप्तरंग

आइस्क्रीम ‘नावडता’ पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी टॉक - अंकिता लोखंडे, अभिनेत्री
अभिनय क्षेत्राच्या सुरवातीच्या काळात मी कोणताही डाएट प्लॅन फॉलो करत नव्हते; तसेच वर्कआउटही करत नव्हते. परंतु, काही काळानंतर मला वर्कआउट आणि डाएट प्लॅनचे महत्त्व समजत गेले आणि मग मी त्याला सुरवात केली. याबाबतीत मी फार नशीबवान आहे की, मला खूप चांगले शरीर लाभले आहे.

यामुळे कधीच माझा बॉडीशेप बिघडलेला नाही, तरीही मी सध्या वर्कआउट व डाएटला महत्त्व देत आहे. 

आपल्याला चांगला बॉडीशेप लाभला असेल आणि आपण जीम केल्यास बॉडी टोन करण्यास मदत मिळते. मी जीमसाठी एक ट्रेनर घेतला आहे, जो माझे विविध प्रकारचे व्यायाम करवून घेत असतो. व्यायाम केला नाही, तर तुमचे शरीर ओबडधोबड वाढू लागते; तसेच नृत्य हेदेखील शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. मी अधूनमधून नृत्याचादेखील सराव करत असते.  

यासोबतच तुमच्याकडे एक चांगला डाएट प्लॅन असणेही गरजेचे असते. माझ्या ट्रेनरने मला आहारावरही नियंत्रण ठेवायला सांगितले, पण हे माझ्यासाठी खूपच कठीण होते. मी फक्त सूप आणि सलाड खाऊन दिवस काढू शकत नाही.

नशिबाने मला गोड, तेलकट आवडत नाही; तसेच मी मद्यपान, धूम्रपानही करत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या जमेच्या बाजू ठरल्या. कुणालाच खरे वाटणार नाही; पण मला भात आणि आइस्क्रीमही आवडत नाही. माझ्या खाण्याच्या सवयींमुळे चपाती व भाजी हा भारतीय आहारच मला घ्यावा लागतो. त्याचबरोबर मी सीझनल फळे खाते. घरी बनवलेलेच जेवण खाल्ल्याने माझी त्वचादेखील चांगली राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT