Mrunal-and-shashank
Mrunal-and-shashank 
सप्तरंग

कामावरच लक्ष केंद्रित!

सकाळ वृत्तसेवा

जोडी पडद्यावरची - मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर
अभिनेता शशांक केतकर ‘होणार सून मी या घरची’, ‘इथेच टाका तंबू’ यांसारख्या मालिकेत झळकला, तर अभिनेत्री मृणाल दुसानिस ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’सारख्या मालिकांमध्ये दिसली. मराठी चित्रपटसृष्टीत बरेच वर्षे काम केल्यानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र आले ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखांच्या सरीने हे मन बावरे’ या मालिकेतून! एकमेकांना फक्त नावाने ओळखणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले असता मृणाल सांगते, ‘‘आम्ही एकमेकांना नावाने ओळखत होतो, पण कधीही एकत्र काम केले नव्हते. या मालिकेच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच भेटलो. या मालिकेचे एक फोटोशूट होते, तेव्हाच आमची पहिल्यांदा भेट झाली. आमच्या पहिल्या भेटीचा अनुभव खूपच चांगला होता. तेव्हा शशांकच माझ्याशी बोलायला आला होता.’’ याबाबत शशांक सांगतो, ‘‘या मालिकेच्या लाँचवेळी आमची पहिली भेट झाली होती. मालिकेच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळाली. मी तिच्यापेक्षा जास्त बोलका असल्याने पहिल्यांदा मीच मृणालशी बोलायला गेलो होतो.’’ 

बरेच महिने एकत्र काम केल्यानंतर एकमेकांसोबत एकत्र काम करण्याचा अनुभव विचारला असता शशांक सांगतो, ‘‘मृणालसोबत काम करताना खूप छान वाटते. ती खूपच प्रोफेशनल आहे. सीन कसे द्यायचे, याची तिला चांगलीच जाण आहे.’’ याबाबत मृणाल सांगते, ‘‘शशांकसोबत काम करताना खूप छान वाटते. आमच्या केमिस्ट्रीची पावती ‘लोकप्रिय जोडी’ म्हणून प्रेक्षकांनी आम्हाला दिलीच आहे. ऑनस्क्रीनबरोबरच ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगली असेल, तरच प्रेक्षकांना ती पडद्यावर छान दिसते. आमचेही तसेच आहे. आमची मैत्रीसुद्धा तितकीच चांगली आहे. सहकलाकार म्हणून आमच्यात कोणतेच हेवे-दावे, राग-रुसवे, भांडण असे काहीही नाही. आम्ही आमच्या कामावरच लक्ष केंद्रित करतो. काम चांगले व्हावे हा आमचा एकच उद्देश असतो आणि आम्ही दोघेही आमच्यापरीने तसा प्रयत्न करतो.’’ 

दोघेही एक कलाकार म्हणून कसे आहेत आणि व्यक्ती म्हणून कसे आहेत विचारल्यावर मृणाल शशांकबद्दल सांगते, ‘‘अभिनेता म्हणून तो खूपच चांगला आहे. याबाबत प्रश्‍नच येत नाही. त्याचा बराच मोठा चाहतावर्गही आहे. व्यावसायिकदृष्ट्या तो यशस्वी अभिनेता आहे. तो व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे. साधा आणि मेहनत करून फक्त कामावर लक्ष केंद्रित करणारा असा शशांक आहे.’’ याबाबत शशांक मृणालबद्दल सांगतो, ‘‘मृणाल अभिनेत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून उत्तम आहे.’’ दोघांच्या आवडत्या आणि नावडत्या गुणांबद्दल विचारले असता शशांक सांगतो, ‘‘मृणाल खूप शांत आहे आणि ती खूपच छान गाते हे तिचे दोन गुण मला खूपच आवडतात. ती तिच्या करिअरमध्ये काही वेगळा प्रयोग करत नाही, तो तिने करावा अशी माझी इच्छा आहे. हा तिच्यातला नावडता गुण आहे.’’

याबाबत मृणाल सांगते, ‘‘शशांक खूपच साधा मुलगा आहे आणि तो सगळ्यांशी खूपच मोकळेपणाने बोलतो. हे त्याच्यातले मला आवडणारे गुण आहेत. तो कधीकधी चित्रीकरणाला खूपच उशिरा पोचतो हा त्याचा नावडता गुण आहे.’’
(शब्दांकन - स्नेहल भांबरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT