Child-Tiffin 
सप्तरंग

चटपटीत, चवदार आणि पौष्टिक

कुमोदिनी आगाशे

पारंपरिक पदार्थही थोडे वेगळ्या पद्धतीने केले की, मुलांच्या पसंतीला उतरतात. अशाच काही पदार्थांची रेसिपीज्‌...

रताळ्याची पोळी
साहित्य - कणीक, रताळी, गूळ, वेलदोडे, थोडे मीठ, २-३ चमचे तेल, साजूक तूप

कृती - शिजलेले रताळे, गूळ, वेलदोडे आणि किंचित मीठ यांचे सारण बनवावे. कणकेचा गोळा लाटून त्यात हे सारण भरून हलक्‍या हाताने पोळी लाटावी आणि खरपूस भाजून गरम गरम साजूक तुपासोबत खायला द्यावी.

मेथीच्या पुऱ्या
मेथीची भाजी कडवट म्हणून ती खाल्ली जात नाही; पण ही भाजी वापरून केलेल्या पुऱ्या सगळ्यांना नक्कीच आवडतील.

साहित्य - प्रत्येकी कपभर कणिक, उडीद डाळीचे पीठ, दीड कप चिरलेली मेथी, ओवा, हिंग, लाल तिखट, मिरचीची पेस्ट, तळण्यासाठी तेल.

कृती - परातीमध्ये वरील सर्व मिश्रण एकजीव मळून घ्या. हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटा आणि गरम तेलात खरपूस तळा.
या पुऱ्या दही, लोणचे किंवा चटणीसोबत खायला द्या.

न्यूडल्स
आजकाल मुलांना न्यूडल्स हा प्रकार खूप आवडतो; पण हे न्यूडल्सदेखील घरच्या घरी बनवून पौष्टिक करू शकतो.

साहित्य - गव्हाचे न्यूडल्स, जिरे, आले, लसूण आणि मिरची पेस्ट, पातीचा कांदा, उकडलेले वाटाणे, मीठ.

कृती - एका पातेल्यात गरम पाण्यात गव्हाचे न्यूडल्स शिजवून घ्यावे आणि पाण्यातून ते वेगळे करावेत. नंतर कढईत तेल गरम करून त्यावर जिरे, आले, लसूण आणि मिरची पेस्टची फोडणी करावी. उकडलेले वाटाणे आणि त्यावर हे शिकवलेले न्यूडल्स आणि चवीनुसार मीठ घालून थोडावेळ परतून घ्यावे. त्यावर पातीचा कांदा घालावा.
हे न्यूडल्स खूप चविष्ट लागतात.
(शब्दांकन - शलाका सावंत)

झटपट डोसे
डोसे म्हटले की, पीठ आंबवण्यासाठी वेळ द्यावा लागतो; पण या डोशांसाठी अगदी ३ ते ४ तास आधी तयारी पुरेशी आहे.

साहित्य - ३ ते ४ तास भिजवलेले उडीद डाळीचे पीठ, कोथिंबीर, मिरची, मीठ.

कृती - भिजवलेल्या उडीद डाळीच्या पिठात कोथिंबीर, मिरची आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करा आणि नॉनस्टिक तव्यावर गरम गरम डोसे काढावेत. हिरव्या चटणीसोबत खायला द्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT