Astrology and Horoscope
Astrology and Horoscope Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 जून 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण ८, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय रात्री १.२७, चंद्रास्त दुपारी १२.३५, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, कालाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ १२ शके १९४३.

दिनविशेष -

१९२९ : प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जन्म. ‘रात और दिन’, ‘बरसात’, ‘चोरी चोरी’, ‘श्री ४२०’, ‘मदर इंडिया’, ‘आवारा’, ‘छोटी भाभी’, ‘बाबूल’ आदी अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

१९४८ : शेतकरी कामगार पक्षाची स्थापना. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय प्रभावी होता.

१९८८ : प्रसिद्ध अभिनेते, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, वितरण या क्षेत्रांत त्यांनी स्वतःची शिखरे निर्माण केली.

१९९२ : महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन.

दिनमान -

मेष : आर्थिक सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कामाचा ताण जाणवेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : मन आनंदी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनू : विरोधकांवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. हितशत्रूंवर मात कराल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT