सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १२ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : माघ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ६.४८, चंद्रास्त सायंकाळी ५.५६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२ अमावास्या प्रारंभ दुपारी ३.०३, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४२. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९१ : मराठी रंगभूमीवरील अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.
१९११ : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमंतक या पक्षाचे संस्थापक, दानशूरत्वाबद्दल गाजलेले नामवंत उद्योगपती दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचा जन्म.
१९१४ : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म.
१९३० : साबरमती आश्रमापासून महात्मा गांधींची दांडीयात्रा सुरू. मिठाचा सत्याग्रह म्हणूनही हा प्रसंग ओळखला जातो.
१९९९ : चलनी नोटांवर यापुढे फक्त महात्मा गांधी यांचेच चित्र असेल, असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
२००१ : राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान.
२००३ : मधुमेहामुळे निर्माण होणारे विविध आजार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या आजारावरील एक  संयुक्त उपचारपद्धती निर्माण केल्याबद्दल भारतीय डॉक्‍टर ज्योती घोष यांना अमेरिकेचा पाच लाख डॉलरचा (२.४ कोटी रुपये) पुरस्कार जाहीर.  

दिनमान -
मेष :
नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.उसनवारी वसूल होईल.
वृषभ : व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : काहींना गुरूकृपा लाभेल. सार्वजनिक कामात उत्साह वाढेल.
कर्क : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे.
तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : काहींना प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उधारी वसूल होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT