Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जुलै

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - आषाढ कृ. ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, कामिका एकादशी चंद्रोदय रा. २.०८, चंद्रास्त दु. ३.२८, भारतीय सौर २५, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४४ - संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे डेक्कन कॉलेजातील प्राध्यापक काशिनाश बाळकृष्ण मराठे यांचा जन्म.
१८७२ - दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुन्सेन यांचा जन्म. १९०३ मध्ये त्यांनी गोया नावाची छोटी होडी तयार केली व सहा सोबत्यांबरोबर ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’  शोधून काढला. १९१० मध्ये ते दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यास निघाले. १९११ मध्ये ते दक्षिण ध्रुवाजवळील रॉस बेटावर उतरले व तेथून १४ डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर पोचले.
१९१४ - साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी चोरघडे यांचा जन्म. 
१९४५ - अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबाँबची न्यू मेक्‍सिकोच्या वाळवंटात चाचणी.
१९९२ - भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड. 
१९९६ - ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामात यश लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे.
कर्क : आर्थिक क्षेत्रात यश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. एखादी चांगली घटना घडेल.
कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. मनोरंजनाकडे कल वाढेल.
वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात विशेष सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
धनु : खर्च योग्य कामासाठी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.
कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात समाधानी वातावरण राहील.
मीन : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात व नोकरीत समाधानकारक स्थिती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT