Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १६ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - फाल्गुन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ८.२२, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ६.४३, भारतीय सौर फाल्गुन २५ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४६ - विख्यात गायक व कोल्हापूर संस्थानचे दरबार गवई अल्लादियाखाँ यांचे निधन. त्यांना दहा ते बारा हजार चीजा मुखोद्‌गत होत्या.
१९९५ - कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व शिक्षणमहर्षी प्राचार्य एम.आर.देसाई यांचे निधन.
१९९६ - ज्येष्ठ मराठी साहित्यिक, लोकशाहीर शंकरभाऊ साठे यांचे निधन.
१९९७ - कर्नाटक शैलीतील संगीताचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक टी.कृष्ण अय्यंगार यांचे निधन.
१९९९ - प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, पुण्याच्या ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स‘चे संचालक आणि ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. व्ही.के.कपाही यांचे निधन.
१९९९ - सुगम संगीताच्या, विशेषतः मराठी भावगीत व लावणीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका कुमुदिनी पेडणेकर यांचे निधन.
१९९९ - जुन्या काळातील इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणाऱ्या लेखिका कुमुदिनी रांगणेकर यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ : वाहने चालवताना काळजी घ्यावी. आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील.
मिथुन : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.
कर्क : काहीना बढतीची शक्‍यता आहे. आर्थिक सुयश लाभेल.
सिंह : महत्त्वाची बातमी समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : वादविवाद टाळावेत. वैवाहिक सौख्य लाभेल.कामात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
धनु : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : प्रॉपर्टी चे नवीन प्रस्ताव येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : साहित्यिक क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. जुनी येणी वसूल होतील.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT