Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 सप्टेंबर 2021

पंचांग - गुरुवार : भाद्रपद शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय दुपारी ३.२६, चंद्रास्त रात्री २.४३, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर भाद्रपद २५ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : भाद्रपद शुद्ध १०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय दुपारी ३.२६, चंद्रास्त रात्री २.४३, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर भाद्रपद २५ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक ओझोन संरक्षण दिन

१७३६ - पाऱ्याचा वापर करून कार्यक्षम तापमापक तयार करणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गाब्रिएल डानिएल फॅरनहाइट यांचे निधन. शरीरातील तापमान मोजण्याची श्रेणी त्यांच्या नावाने ओळखली जाते. पाण्याचा उत्कलनबिंदू वातावरणीय दाबानुसार बदलतो, हे त्यांचे महत्त्वाचे शोध.

१९४२ - विख्यात निसर्ग कवी, प्रयोगशील शेतकरी, अभ्यासू आमदार ना. धों.महानोर यांचा जन्म. ‘अजिंठा’, ‘वही’, ‘रानातल्या कविता’, ‘प्रार्थना दयाघना’, ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ हे कविता संग्रह, ‘गांधारी’ ही कादंबरी, पळसखेडची गाणी, गपसप या लोकसाहित्याचे संपादन, केले. तसेच त्यांनी ‘जैत रे जैत’, ‘सर्जा’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’ आदी चित्रपटांना दिलेली गाणी लोकप्रिय आहेत.

दिनमान -

मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने सावकाश चालवावीत.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस अनुकूल आहे.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT